भोकर :(रमेश गंगासागरे )
भोकर तालुक्यातील पोमनाळा येथे असलेली कॉटन मिल आणि उमरी रोडवर असलेल्या मनजीत कॉटन प्रायव्हेट लिमिटेड मध्ये शेतकऱ्यांच्या नावावर काही व्यापारी कापूस विक्री करत असल्याचा गैरप्रकार आज भोकर चे तहसीलदार श्री भरत सूर्यवंशी यांनी उघडकीस आणला असून गैरप्रकार करणाऱ्या ्यापार्यावर लवकरच गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे.
मागील अनेक दिवसांपासून तालुक्यात कार्यरत असलेल्या कॉटन मिलवर काही व्यापारी नागरिक शेतकऱ्यांचे नाव पुढे करून स्वतः खरेदी केलेला कापूस विक्री करत असल्याची माहिती भोकरच्या उपविभागीय अधिकाऱ्याला मिळाली, त्यावरून आज दि. 10 जून रोज बुधवारी मा. पवन चांडक (उपविभागीय अधिकारी भोकर) व मा. भरत सुर्यवंशी (तहसीलदार भोकर) येथील मनजित कॉटन मिल तसेच मौ. पोमनाळा येथील कॉटन मिलला भेट देऊन अचानकपणे तपासणी केली. तपासणीदरम्यान त्यांना अनेक व्यापारी शेतकऱ्यांचा कापूस आहे असा भास निर्माण करत असल्याचे उघड झाले आहे त्यावरून अशा ्यापार्यावर उपविभागीय अधिकारी श्री पवन चांडक हे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करणार असल्यामुळे अशा व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या home वर क्लिक करा

![]() |
| कॉटन मिलवर तपासणी करताना अधिकारी दिसत आहेत |

0 Comments