भोकर :(रमेश गंगासागरे ) सध्या भारतामध्ये कोरोना सारखा महारोग पसरला असल्याने या महारोगापासून स्वतःचा व इतरांचा कशापद्धतीने बचाव करावा याचा संदेश लघु चित्रपटाद्वारे भोकरचे जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री मुजीब शेख यांनी नुकताच दिला आहे.
चित्रपटाचा मजकूर समजून सांगत असताना न्यायाधीश श्री मुजीब शेख

     सदरील चित्रपटाची थोडक्यात माहिती अशी की, तालुका विधी सेवा समिती भोकरच्या वतीने ही दहा मिनिटाची चित्रफित भोकर शहरातील विविध भागात चित्रित करण्यात आली आहे, चल चित्रामध्ये देण्यात आलेल्या संदेशात मुंबईवरून आलेला एक कोरोना बाधित तरुण त्यांच्याद्वारे इतरांना कोरोना covid-19 हा रोग कसा पसरतो, त्यानंतर एक व्यक्ती किती जणांना बाधित करू शकते, याचे उत्तम उदाहरण सदरील दहा मिनिटाच्या चल चित्राद्वारे न्यायाधीशांनी जनतेपर्यंत पोहोचविला आहे, सदरील चल चित्रांमध्ये अभिनय केलेले भोकर न्यायालयात काम करत असलेले विधी तज्ञ यांचा समावेश असून त्यांनी एखाद्या नामवंत कलाकाराला शोभेल असा अभिनय सदरील चित्रपटामध्ये केल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
       शेवटी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री मुजीब शेख यांनी कोरोना पासून बचाव करण्यासाठी जनतेला शासनाने दिलेल्या नियमाचे काटेकोरपणे पालन करण्याचे या लघु चित्रपटात आवाहन केले आहे. सदरील लघुचित्रपट सर्व नागरिकांनी अवश्य पहावा व शासनाचा हा चांगला संदेश प्रत्येक व्यक्ती पर्यंत पोहोचवावा असे अवाहन तालुका विधी सेवा समितीतर्फे करण्यात आले आहे.

लघु चित्रपट पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 
तालुका विद्यी सेवा समिती भोकर जिल्हा नांदेड निर्मित लघुचित्रपट  https://youtu.be/3GG1AYa_Ark

इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या home वर क्लिक करा