भोकर :-(रमेश गंगासागरे ) महाराष्ट्रात मागासवर्गीय समाजावर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात आज उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर भीम टायगर सेनेच्या वतीने अर्धनग्न आंदोलन करण्यात आले असून उपविभागीय अधिकाऱ्यांना संघटनेच्यावतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.
(छाया:संदीप गंगासागरे भोकर)

       आज दिनांक 25 जून रोजी भोकर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या समोर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास भिम टायगर सेना शाखा भोकर च्या वतीने भीम टायगर सेनेचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब शेळके यांच्या उपस्थितीत अर्धनग्न आंदोलन करण्यात आले, यात महाराष्ट्रात मागासवर्गीय यावर होत असलेल्या जुलमी अत्याचाराचा विरोध दर्शविण्यासाठी सदरील आंदोलन करत असल्याचे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, सदरील निवेदनात एकूण पाच मागण्या मान्य करण्यासंदर्भात प्रशासनाला पत्र दिले आहे त्यात 1) विराज जगताप व अरविंद बनसोड यांच्या हत्येची अनुसूचित जाती जमाती आयोगामार्फत चौकशी करून त्यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी. 2) विराज जगताप व अरविंद बनसोड यांच्या कुटुंबास शासनाने एक कोटीची मदत करावी.3)  मागासवर्गीयांना कायदेशीर संरक्षण द्यावे 4) सोबतच त्या कुटुंबीय यापैकी एकास शासकीय सेवेत सामावून घ्यावे. ५) मागासवर्गीयांना स्वतःच्या रक्षणासाठी रिवाल्वर बाळगण्याची परवानगी द्यावी अशी मागणी दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे, निवेदनावर संस्थापक अध्यक्ष  दादासाहेब शेळके,  विजयकुमार ऍंगडे, मिलिंद गायकवाड, राहुल सोनकांबळे, निखिल हंकारे,  संमेक चौदनते,  प्रतिक कदम,  मनोज आंबेगावकर, दीपक खंदारे ,  यांच्यासह भिम टायगर सेनेच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.
       ईतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या home वर क्लिक करा.