ठाणे : (वृत्त संस्था ) ठाणे महानगरपालिकेने एका खाजगी लॅबवर कारवाई केली आहे. या लॅबमधून आणलेले पाच जणांचे covid-19 चे रिपोर्ट पॉझिटिव्ह होते मात्र त्यानंतर महानगरपालिकेने केलेल्या चाचणीत तेच रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
थायरो केअर नावाची ही खाजगी लॅब आहे. या लॅबला ठाणे महानगरपालिका क्षेत्रात चाचण्या न करण्याचे आदेश एका नोटीस द्वारे महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी दिले आहेत. मुंब्रा येथे राहणारे समीर खान यांचे कुटुंब आहे. या कुटुंबात आधारस्तंभ असलेल्या त्यांच्या वडिलांचा अचानक मृत्यू झाला. मात्र मृत्यूनंतर त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. त्यामुळे घरातील एकूण बारा जणांची चाचणी थायरोकेयर या खाजगी लॅब मधून समीरने करून घेतली. त्यासाठी त्याने 36 हजार रुपये मोजले. ज्यावेळी या चाचणीचा रिपोर्ट आला. त्या रिपोर्टमध्ये सहा जण पॉझिटिव्ह असल्याचा निदर्शनास आले. त्यांच्या घरी थेट महानगरपालिकेचे कर्मचारी त्यांना घेऊन जाण्यास आले. त्यानंतर विलगीकरण कक्षात असताना ठाणे महानगरपालिकेकडून त्यांची दुसऱ्या दिवशी चाचणी करण्यात आली होती.
इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या home वर क्लिक करा
![]() |
| संग्रहित छायाचित्र |

0 Comments