भोकर :(रमेश गंगासागरे ) ग्रामीण रुग्णालय भोकर येथील श्रीमती आर.बी.रामधनी मँडम प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी हे आज दि.३० जून रोजी नियत वयोमानानुसार शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाल्या आहेत.
       मागील सहा वर्षापासून भोकर ग्रामीण रुग्णालयात त्यांनी आपले कर्तव्य बजावले होते, ह्यापूर्वी ते नायगाव, नांदेड, हदगाव येथे सुद्धा यशस्वीरित्या आपले कर्तव्य बजावले होते, भोकर मध्ये इसवी सन 2014 मध्ये रुजू झाल्यापासून त्यांनी निवृत्त होईपर्यंत विनातक्रार कर्तव्य बजावले आहे, त्यांनी प्रयोगशाळा वैज्ञानिक म्हणून 30 वर्षाची सेवा बजावली आहे. आज 30 जून रोजी त्यांचा कार्यकाल संपल्यामुळे त्यांना  ग्रा.रु.भोकर येथील अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने निरोप देन्यात आला, त्यावेळी डॉ. अशोक मुंडे वैद्यकीय अधिक्षक, डॉ सुक्रे, सत्यजीत टिप्रेसवार आरोग्य सहाय्यक, डॉ उमेश जाधव, अत्रीनंदन पांचाळ, दरबस्तवार, शेळके, मनोज पांचाळ, तम्मलवाड, कंधारे, संदीप ठाकूर, धोंडगे, साबेर झाहेद, सुरेश डुम्मलवाड,क्षीरसागर, श्रीमती चव्हाण, कुलकर्णी, मादाळे, दिवटे, पंदीलवाड, मामीडवार, संगेवार, आदींची उपस्थिती होती.

       इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या home वर क्लिक करा