नायगाव : (गंगाधर गंगासागरे ) नांदेड - हैदराबाद राज्य महामार्गावर असलेल्या कृष्णूर औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांनी सोडलेले रसायनमिश्रित दुषित पाणी थेट एका नाल्यात मिसळत असल्यामुळे नागरिक व जनावरांच्या आरोग्याला तीव्र स्वरूपाचा धोका निर्माण झाला आहे.
हे रसायनमिश्रीत पाणी सोडणे बंद करावे.तसेच कृष्णूर औद्योगिक वसाहतीमधील व्यंकेज इंडिया लिमिटेड व कीर्ती ऑइल या दोन्ही कंपन्यांची चौकशी करून यावर कार्यवाही करण्यात येण्याची मागणी नांदेड जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस दत्तात्रय जाधव कृष्णूरकर यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हा प्रदूषण विभाग यांच्याकडे केली आहे.
औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांमधून रसायनमिश्रित दूषित पाणी सर्रासपणे F ब्लॉक मधील महादेव मंदिर परिसरातील एका नाल्यात सोडले जात आहे. सांडपाणी उघड्यावर सोडू नये अशी वारंवार विनंती करूनही हे कारखाने कोणतीच उपाययोजना करीत नाही. परिणामी सोडलेल्या दूषित पाण्यामुळे परिसरातील नागरिकांना व जनावरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात ऑक्टोबर 2019 मध्ये देखील या कारखान्यालगत असलेल्या बरबडा शिवारातील शेतकऱ्यांनी अनेक तक्रारी केल्या होत्या. परिणामी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ औरंगाबाद व नांदेड येथील संयुक्त पथकाने याप्रकरणी चौकशी करून कारवाईदेखील केली होती. याउपरही आणखी तोच प्रकार पुढे येत आहे. हा सर्व प्रकार थांबावा यासाठी दत्तात्रय जाधव यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ नांदेड, तहसील कार्यालय नायगाव यासह ग्रामपंचायत कार्यालय कृष्णूर या सर्व ठिकाणी तक्रारीच निवेदन दिलं आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने याकडे लक्ष देऊन संबंधित कारखान्याविरोधात कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांना सुरुवातीला सर्वच विभागांकडून परवानग्या देताना सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावण्याचे नमूद करण्यात येते असे असतानादेखील नेहमी कारखान्यांचे सांडपाणी उघड्यावरच का सोडले जाते..? यासाठी संबंधित महामंडळ यांनी काही यावर काय उपाय योजना केली..? केली नसेल तर का नाही ?
प्रदूषण नियंत्रण मंडळ कारवाई करेलही मात्र महाराष्ट्र औद्योगिक वसाहत महामंडळाचे अधिकारी या समस्येकडे गांभीर्याने का घेत नाहीत..? हे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.
मागील दोन दिवसात या भागात पाऊस झाला होता. त्या पावसाचं पाणी नाल्यात जमा झाल असेल. आमच्या कंपनीचं ते दूषित पाणी नाही. तक्रारदारांनी याबाबतीत कसलीही शहानिशा न करता केवळ कंपनीत काम न दिल्यामुळे बदनामीसाठी हा उपद्व्याप सुरू केला आहे.
सी.एन.पाटील
व्यवस्थापक व्यंकिज इंडिया लिमिटेड कंपनी, कृष्णूर .
इतर बातम्या साठी खाली दिलेल्या Home ला टच करा

0 Comments