मुदखेड:-पिराजी गाडेकर
मुदखेड तालुक्यातील बारड ही ग्रामपंचायत विविध उपक्रमांनी संपूर्ण राज्यात चर्चेत आहे. मालमत्ता कर भरलेल्या घरासाठी अत्यल्प दरात पीठ, गिरणी व्दारे दळन दळून देण्यासाठी व्यवस्था ग्रामपंचायतने करून दिली आहे. हा एक स्तुत्य उपक्रम गावाच्या विकासात मोलाची कामगिरी करणारा आहे.
यावेळी उदघाटन बारडच्या प्रथम नागरिक सरपंच जयश्री विलास देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
गहू आणि ज्वारी एक धडी पाच रुपये असं संपूर्ण गावासाठी ही सार्वजनिक गिरणी आहे. तसेच बारड ग्रामपंचायत ने यापूर्वी बरेच नाविन्य पूर्ण उपक्रम राबविले आहेत. या मध्ये महाराष्ट्र राज्यातील प्रथम क्रमांकाचे गाव आसेल ज्यांनी धार्मिक स्थळावरील भोंगे काढण्याचा निर्णय घेतला आहे. गावामध्ये सी.सी.टी.व्ही. यंत्रणा, गावामध्ये महिती प्रसारीत करण्यासाठी ध्वनीप्रेक्षपण गावातील घन कचरा उचलण्यासाठी घंटा गाडी, पाणी टंचाई काळामध्ये पाणी पुरवठासाठी पाणी टँकर, गावातील मुख्य व धार्मिक ठिकाणी हायमास, असे अनेक आगळेवेगळे उपक्रम राबविण्यात बारड ग्रामपंचायत नेहमीच अग्रेसर राहली आहे.
यावेळी बारडचे उपसरपंच बाळासाहेब देशमुख ग्रामविकास अधिकारी अनूप श्रीवास्तव, तंटामुक्ती अध्यक्ष नरहरी आठवले,सरपंच प्रतिनिधी विलास देशमुख ,ग्रा.प.सदस्य माणिकराव लोमटे, बालाजी निलेवार , रघुनाथराव देशमुख, किशोर देशमुख , वसंतराव देशमुख, प्रभाकर भीमेवार, गोविंद बने, यशवंत पवार ,आश्या वर्कर, अंगणवाडी सेविका इत्यादींची उपस्थिती होती.
इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेले home दाबा

0 Comments