बारड :- ( पिराजी गाडेकर )
     मुदखेड तालुक्यातील बारड या गावी जिल्हा पुरवठा कार्यालयाचे तपासणी पथकाने अचानक पणे बारड येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थथेला भेट देऊन रास्त भाव दुकान क्रमांक १,२ व ३ या दुकानाची अचानक पाहणी अधिकारी जयभाय यांच्या टीम  द्वारे पाहणी करण्यात आली होती.
स्वस्त धान्य दुकानाची पाहणी करताना अधिकारी दिसत आहेत
     धान्य वाटपा विषयी पुरवठा हा व्यवस्थित चलतोका? दर महिन्याला  प्रत्येक व्यक्तीला संपूर्ण गावातील लाभार्थ्यांना याचा योग्य लाभ मिळतो का ? असे प्रश्न काही लाभार्थींना अधिकाऱ्या मार्फत विचारपुस करण्यात आले. लाभार्थी यांचे कडून  काही प्रश्नांची समाधान कारक उतरे मिळाल्यामुळे तपासणी अधिकारी यांनी समाधान व्यक्त केले असून.
  यामध्ये या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष रघुनाथराव देशमुख, उपाध्यक्ष महादु भिमेवार, संचालक बाळासाहेब देशमुख, माधव लोमटे इत्यादीचे विशेष लक्ष या रास्त धान्य वितरण व्यवस्थेवर असते. आणि यावेळी धान्य वाटपाचे अभिलेख तपासण्यात आले. एकंदरीत संपूर्ण योजनेचे धान्याचे वाटप  योग्य प्रकारे चालू असून त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात आले  कारण की या स्वस्त धान्य दुकानातील सर्व अन्नधान्य लाभार्थ्यांपर्यंत ऑनलाइन पद्धतीने १०० टक्के पूर्णपणे वाटप केल्या जाते, आणि त्याची  ग्राहकांना ईपोस यंत्रातून निघालेली पावती आणि पावती प्रमाणे धान्य काढून दिल्या जाते. आणि जी रकम आहे तेवढीच रकम स्वीकारल्या जाते स्वस्त धान्य दुकान व्यवस्थापक प्रल्हाद जोंधळे आणि  त्यांच्या सोबत इतर स्वस्त धान्य दुकानातील सर्व कर्मचारी लाभार्थ्यासोबत प्रेमाने वागणूक देत व्यवस्थित पने काम करत असताना. यामुळेच बारड स्वस्त धान्य दुकानाची लाभार्थ्यांकडून कुठल्याच प्रकारे तक्रार आतापर्यंत उद्भवली नाही.
       ईतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या home वर क्लिक करा