नायगांव:-  गंगाधर गंगासागरे .

        नांदेड - देगलूर राज्य महामार्गावर शंकरनगर पासून जवळच असलेल्या धुप्पा [ ता.नायगाव ] गावानजीक दि.14 जुन रोजी पहाटेच्या  सुमारास  ट्रक व आयचेर टेम्पोची समोरासमोर जोराची धडक होऊन झालेल्या भिषण अपघातात आयचर टेम्पोचा चालक जागीच ठार झाला तर एक गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी नांदेड येथे पाठवन्यात आले आहे.
        सविस्तर माहिती असी कि, नांदेड-देगलुर राज्यमहामार्गावर शंकरनगर पासून जवळच धुप्पा शिवाराजत  नांदेड कडून देगलूर कडे एम. पी.13 - जि.ए.1968 क्रमांकाचा आयचेर टेम्पो टेलिफोनचे केबल घेऊन जात असताना देगलूर कडून नांदेडकडे जाणारा एम. एच. 26 - ए.डि.- 0402 क्रमांकाचे ट्रक चालकाने दि.14 जुन रोजी पहाटेच्या सुमारास  धुप्पा येथील हणमंत घोंगडे यांच्या शेताजवळ आपल्या हातातील ट्रक हायगाई व निष्काळजीपने भरधाव वेगाने समोरून येत असलेल्या ऐचेयर टेम्पोस जोराची धडक दिल्याने या झालेल्या भिषण अपघातात ऐचेअर टेंपोचा चालक तेजपाल देवसींग गावस्कर (वय 25 रा.सिसोदिया तह) जि.धार (मध्यप्रदेश) हा जागीच  ठार झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला.  यात दोन्ही वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ट्रक अपघात झाल्यानंतर रोडच्या डाव्या बाजूला मोठ्या खड्ड्यात पलटी होउन पडला तर ऐयचेर टेम्पोच्या बाॅडिचा चेंदामेंदा झाला होता .
       हि घटना समजताच रामतीर्थ पोलीस घटनास्थळी धाव घेउन मयत व जखमींना बाहेर काढून मयताचे शवविच्छेदन करून त्यांच्या नातेवाईकांना डेथबाॅडी पाठवून दिले.
       या प्रकरणी ऐयचर टेम्पोचे कीनर अंकेश पिता सेवानंद गोसारी( वय 24 वर्षे रा. सिसोदिया तह) जि.धार(मध्यप्रदेश) यांनी दिलेल्या   फिर्यादी वरून रामतीर्थ पोलीस ठाण्यात भादवि कलम 279/337/338/304 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास फौजदार राम घाटगे हे करीत आहेत.