भोकर :(रमेश गंगासागरे )  मागील एका वर्षांपासून सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या सेवा समर्पण परिवारने आता भोकर शहरातील ऐतिहासिक दत्त गडावरील तलावाचे खोलीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. या कामाची सुरुवात भोकरचे तहसीलदार भरत सुर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आली.
           सेवा समर्पण परिवार मागील एका वर्षांपासून सेवाभावी वृत्तीने काम करत आहे. पाणी फाऊंडेशन आयोजित सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या गावात सेवा समर्पण परिवार ने सतत श्रमदान केले. कोळगाव बु. येथे रखरखत्या उन्हात घामाचे थेंब गाळत शेततळे खोदले. ग्रामीण रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाइकांना चादर वाटप, लाकडाऊन च्या कालावधी गरजूंना धान्याचे किट वाटप, दत्तगडावर वृक्षारोपण करून ती झाडे जोपासण्याचे काम, अशा अनेक कामात सेवा समर्पण परिवार सतत परिश्रम घेत आहे. भोकरच्या ऐतिहासिक दत्त गडावरील तलावात दरवर्षी गणेशाचे विसर्जन करण्यात येते. यातलावा भोवती सेवा समर्पण परिवार ने श्रमदानातून माॅर्निग ट्रॅक केला आहे. आता या तलावाच्या खोलीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे.
           खोलीकरण करण्याच्या कामाची सुरुवात तहसीलदार भरत सुर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी दत्त गडाचे महंत उत्तम बन महाराज, महंत शांतीबन महाराज, बाजार समितीचे संचालक सुभाष पाटील किन्हाळकर, देवानंद द्युत, प्रा. व्यंकट माने, संजय मोरे, अनिल चिंतावार, सेवा समर्पण परिवारचे सर्व पदाधिकारी यांची उपस्थिती होती. सदरील तलावाचे खोलीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. या नंतर या तलालाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे.

इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या home वर क्लिक करा.