नायगांव :- गंगाधर गंगासागरे
मृग नक्षत्राच्या आगमन होताच नायगांव [खै.]महसुल विभागाने रेती वाहतुकीस परवानगी दिल्यामुळे
येथून जवळच असलेल्या मेळगाव [ता.नायगांव खै.] रोडची अक्षरशः वाट लागल्याचे बोलके चित्र दिसत आहे .
मेळगाव हे गाव नांदेड जिल्ह्यातील नायगांव[खै.] तालुक्यात येत असून गोदावरी नदी काठावर आहे येथील लोकसंख्या ही दोन हजारच्या जवळपास आहे . गतवर्षी येथील वाळू घाटाचा लिलाव झाला होता त्यावेळी संबधीत लिलावधारकाने मोठ्या प्रमाणात अतिरीक्त वाळू उत्खनन केले होते . आज तागायत गावपरीसरात हजारो ब्रास वाळू साठे उपलब्ध आहेत .
सदरील वाळूला मोठ्या प्रमाणात मागणी आहे .चार ते पाच ब्रास वाळू पंचेचाळीस हजार रुपयास विकली जात आहे . मागील आठ दिवसात मेळगाव येथील गट क्रमांक ४० मधून वाळू विक्री झाली प्रत्यक हायवा ट्रकमधून चाळीस टन वाळू वाहतुक झाली. जड वाहनांची रेलचेल झाल्यामुळे गावच्या रहदारीसाठी आसणारा रस्ता पुर्णता उखडल्या गेला . त्यामुळे गावातील नागरीकांची मोठी गैरसोय निर्माण झाली असून स्वताची दुचाकी देखील ढकलीत आणावी लागत आसल्याचे सांगण्यात येत आहे . पावसाळा आजून पुढेच आहे तेव्हा सदरील रस्त्याची सुधारणा लवकरात-लवकर करावी अशी मागणी केली जात आहे .
वाहतुकीस परवानगी द्यायला नको होते
-- आनंदराव पा. शिंदे
नागरीकांचे हीत लक्षात घेता महसुल विभागाने आईन पावसाच्या तोंडावर वाळू वाहतुकीस परवानगी द्यायला नको होते. अशी प्रतीक्रीया मेळगाव चे सरपंच प्रतिनिधी आनंदराव पा. शिंदे यांनी दिली आहे .

0 Comments