भोकर :(रमेश गंगासागरे ) वृत्त संकलनासाठी गेलेल्या पत्रकाराचा अचानक उडत आलेल्या पतंगाच्या मांजाने गाल व हानूवटी कापली गेल्याने बारा टाके पडले असून त्यांचा जीव थोडक्यात बचवला आहे.
![]() |
| जखमी झालेले हेच ते पत्रकार अनिल डोईफोडे |
घटनेबाबत थोडक्यात माहिती अशी की, दैनिक दलितवाणीचे पत्रकार अनिल डोईफोडे हे सोमवार दिनांक 8 जून रोजी कृषी कार्यालय भोकर येथे वृत्त संकलनासाठी जाऊन आपल्या दुचाकीवरून परत येत असताना गांधी चौकात अचानक एक पतंग त्यांच्या समोरून उडत आली, त्या पतंगास चायना मांजा असल्याने पत्रकार डोईफोडे यांच्या लक्षात आले नाही, त्यामुळे हा मांजा त्यांच्या चेहऱ्यावर भोवती लपेटला गेल्याने गाल व हनुवटी एका क्षणात कापली गेली, दैवत बलवत्तर म्हणून गळा कापला गेला नाही, त्यांना तात्काळ काही नागरिकांनी ग्रामीण रुग्णालय भोकर येथे उपचारासाठी दाखल केले, तिथे त्यांच्या कापलेल्या टाके मारण्यात आले असून, गाल व हनुवटी वर एकूण बारा टाके पडले आहेत.
देशात सर्वत्र चायना मांजावर विक्रीसाठी बंदी असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणात भोकर शहरात चायना मांजा विक्रीसाठी आलाच कसा? असा प्रश्न येथील पत्रकार आणि सामान्य नागरिकाना पडला आहे, चायना मांजा विक्री करणाऱ्या दुकानावर तात्काळ कायदेशीर कार्यवाही करावी,व पत्रकारास न्याय द्यावा अशी मागणी भोकर येथील पत्रकार संघटना व नागरिकांकडून करण्यात येत आहे.
सध्या पत्रकार अनिल डोईफोडे यांची तब्येत स्थिर असून डॉक्टरांनी त्यांना घरीच एक महिना आराम करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या home वर क्लिक करा.

0 Comments