भोकर :(रमेश गंगासागरे ) शासकीय कामात अडथळा आनल्याच्या कारणावरून माजी नगरसेवक केशव मुद्देवाड यांच्याविरोधात तेथील कर्मचाऱ्यांनी आज सोमवार दि, 8 जून रोजी एकदिवशीय कामबंद आंदोलन केले आहे.

       दिनांक 5 जून रोजी मुख्याधिकारी भोकर यांना महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग कर्मचारी संघटना यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,दि,4 जून रोजी नगरसेवक केशव रामा मुद्दे वाढ याने नगर परिषदेमध्ये येऊन कार्यालयीन लिपिक साहेबराव मोरे यांच्याशी हुज्जत घालून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत तसेच जातीवाचक शिवीगाळ करून शासकीय कामकाजात अडथळा आणला आहे त्यांचेवर योग्य ती कार्यवाही तात्काळ करावी यासाठी 8 जून रोजी सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने एक दिवसीय काम बंद आंदोलन करत असल्याचे म्हटले आहे. त्यानुसार आज दिनांक 8 जून रोजी सर्व कर्मचारी काम बंद आंदोलन करत आहेत.
       नगरसेवक केशव मुद्देवाड यांच्यावर गुन्हा दाखल होताच दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करून नांदेड येथून अटक करून भोकर येथील न्यायालयापुढे उभे केले असता, त्यास न्यायालयाने त्यास तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. सध्या नगरसेवक मुद्देवाड पोलीस कोठडी मध्ये असून पोलिस कोठडीची मुदत आज संपत असल्याचे कळते.

ईतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या home वर क्लिक करा.