भोकर :(रमेश गंगासागरे ) तालुक्यातील चिंचाळा येथील शेतकरी शेतात काम करत असताना अचानक विद्युत तारेला स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे.
घटनेबाबत थोडक्यात माहिती अशी की, आज गुरुवार दिनांक 11 जून रोजी दुपारी शेतकरी नामे परसराम संभाजी मामडे वय वर्ष 50 हे आपल्या शेतामध्ये शेतीचे कामे करत असताना, अचानक विद्युत तारेला स्पर्श झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे, सदरील घटनेची पोलिसात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून, मयत शेतकरी मामडे यांच्या पाठीमागे आई, पत्नी, एक मुलगा, आणि एक मुलगी असा परिवार आहे. शेतकरी मामडे यांच्या मृत्यूने चिंचाळा या गावात शोककळा पसरली आहे.

0 Comments