भोकर :(रमेश गंगासागरे ) निवघा बाजार येथील विधवा स्त्री जिच्या एकमेव कमवत्या मुलाने बहिणीचे लग्न ठरवून आत्महत्या केली असल्याने संबंध जिल्हाभर हळहळ व्यक्त केल्या जात होती.
घटनेबाबत थोडक्यात माहिती अशी की, नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील निवघा बाजार येथील एका गरीब कुटुंबाची ही सत्य कहानी असून, घरात एक मुलगा,आई व मुलगी असे तीनच सदस्य राहत होते, त्यातच मुलगा हा एकमेव घरातील कमावता व्यक्ती होता, घरात अठरा विश्व दारिद्र्य होते, अनेक वर्षापासून तो बहिणीचे लग्न थाटामाटात करण्याच्या विचारात असतानाच, बहिणीसाठी एक सुंदर स्थळ बघायला आले, मुलाने मुलीला पसंत केले व मुलीने मुलास पसंत केले सोयरीक झाली. लग्नाची तारीख 29 जून काढण्यात आली, घरामध्ये सगळे आनंदाचे वातावरण असतानाच रात्रभर मुलगा बहिणीचे लग्न कसे करावे ह्या विचारातच असताना, तो त्याच रात्री आत्महत्या करतो, ही बाब वाऱ्यासारखी संबंधित गावभर, तालुकाभर आणि जिल्हाभर वाऱ्यासारखीपसरली, घरातील कमावता एकमेव पुत्र गेल्याने एका असहाय्य स्त्री समोर भले मोठे संकट उभे राहिले व तिने वृत्त पत्रामधून मुलीच्या लग्ना साठी मदत करण्याचे आवाहन केले. ही बातमी भोकर येथील न्यायालयात पसरली तसेच नांदेड येथील न्यायालयातही आत्महत्याग्रस्त कुटुंबाला प्रति आदरभाव निर्माण झाला आणि
आदरणीय धोळकिया साहेब प्रमुख जिल्हा न्यायाधीश नांदेड, यांचे प्रेरणेने व सहकार्यातून त्या स्त्रीच्या आवहनाला भोकर येथील आदरणीय जिल्हा न्यायाधीश एम.एस. शेख साहेब, आदरणीय श्री पांडे साहेब, व तळेकर मॅडम न्यायाधिश, वकिल व कर्मचारी बंधुंनी स्वेछेने आर्थिक मदत केली. तसेच, आदरणीय धोळकिया साहेब यांनी सुद्धा मोलाचा हातभार लावला. वधू साठी शालू व वरा साठी पोशाख व रोख रु. 17,551 ची मदत त्या कुटुंबास पोहचवण्यात आली. एका गरिब कुटुंबाच्या अडचणीच्या प्रसंगी आम्हाला खारिचा वाटा उचलता आला, याचे समाधान वाटते असे उद्गार न्यायमूर्तींनी काढले आहेत.
गरीब कुटुंबाप्रती आदरभाव दाखविणाऱ्या तसेच न्यायदाना सारखे अनमोल कार्य करणाऱ्या न्यायाधीश व वकील मंडळीचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

0 Comments