भोकर :(रमेश गंगासागरे ) लॉक डाऊन च्या कार्यकाळात वीज वितरण कंपनीने ग्राहकांना वीज बिल माफ न करता अव्वाच्यासव्वा विज बिल दिल्यामुळे भोकर भाजपच्या वतीने आज दुपारी 12 वाजताच्या दरम्यान डॉक्टर आंबेडकर चौक भोकर येथे विज बिलाची होळी करून अभियंत्याला निवेदन सादर करण्यात येणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष किशोर पाटील लगळुदकर यांनी दिली आहे.
कोरोना महामारी मध्ये सर्वत्र लॉकडाऊन चालू असल्याने सर्व नागरिक आपापल्या घरांमध्येच बंदिस्त झाले होते, हाताला काम नाही, शेतीमध्ये काम नाही, दुकाने बंद, सर्व व्यवहार ठप्प असे असताना सरकारने आणि वीज वितरण कंपनीने विज बिल पूर्णतः माफ करायला हवे होते, पण वीज वितरण कंपनीने व सरकारने वीज बिल माफ न करता अवाच्या सव्वा विजबिल ग्राहकांच्या माथी मारल्यामुळे, त्यांच्याकडे वीज बिल भरण्या एवढे पैसे नसल्याने हे वीज बिल 100% टक्के माफ करण्यात यावे यासाठी भाजपच्या वतीने संबंध महाराष्ट्रभर वीज बिलाची होळी करण्यात येत आहे, त्याचाच एक भाग म्हणून आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पाठिंबा म्हणून भोकर भाजपच्या वतीने आज दिनांक 27 जून रोजी शनिवारी डॉक्टर आंबेडकर चौक भोकर येथे 12 वाजता वीज बिलाची होळी करण्यात येत असून यासाठी सर्व नागरिकांनी ह्या कार्यक्रमात भाग घ्यावा असे आवाहन तालुकाध्यक्ष किशोर पाटील लगळुदकर यांनी केले आहे.
इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या home वर क्लिक करा
इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या home वर क्लिक करा

0 Comments