नायगांव (ता.प्र.) गंगाधर गंगासागरे 
        नायगाव कार्यक्षेत्रामध्ये प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या लाभधारकांचे
      बांधकाम सुरू करून  जवळपास एक वर्ष होत आहे . आणि  लाभधारकांना  वेळेवर  रेती मिळत नसल्या कारणाने 952 बांधकामे रखडलेले आहेत.
      तसेच रेती न मिळणे वेळेवर या बाबीचे  विविध कारणे आहेत याची जाणीव  सर्व  नागरिकांना  आहे  पण  आइपल्या महसूल विभागाने प्रतिब्रास आज रोजी 4300 व 18 टक्के जीएसटी दहा टक्के डी डी अशाप्रमाणे महाराष्ट्र शासन महसूल वसूल करत आहे म्हणून सर्वात जास्त त्रास व  पिळवणूक गोरगरीब कामगार ,मजदूर, मध्यमवर्गीय व्यापारी बांधव,  मध्यमवर्गीय कुटुंब, यांच्या खिशाला आर्थिक नुस्कान होत आहे आणि आज रोजी प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या लाभधारकांची चे बांधकाम रखडलेले आहेत रेती अभावी  सर्वे कामे ठप्प आहेत आणि सन वर्ष 2018 व 19  अठरा-एकोणीस मध्ये भाजपा  सरकारने तथा महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या निर्णया प्रमाणे प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या लाभधारकांना तात्काळ रेती उपलब्ध करून देण्यात यावे
       आपल्या अंतर्गत आम्ही दिलेल्या निवेदनाप्रमाणे जिल्हा अधिकारी , उपजिल्हाधिकारी , तहसीलदार नायगाव यांच्याकडे शिफारस करून तात्काळ आदेश मागून घ्यावेत आणि नायगाव शहरातल्या तमाम प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या लाभधारकांना रेती उपलब्ध करून देण्यात यावे  अशी मागणी करण्यात आलेली आहे. निवेदक  सौ. पार्वती शंकरराव पाटील चव्हाण भाजपा नगरसेविका, देवीदास पाटील बोमंनाळे नगरसेवक नायगाव, गजानन शंकरराव पाटील चव्हाण, शेख तबस्सुम फातेमा  नगरसेविका नायगाव,  रघुनाथ  सोनकांबळे  (सामाजिक कार्यकर्ता) , प्रा. डॉ. जीवन पा चव्हाण, गंगाधर पाटील कल्याण, भाऊराव पाटील चव्हाण,  हरिचंद्र पा चव्हाण, संजय पा चव्हाण,  कैलास  भालेराव,  माधव शंकर कल्याण, सय्यद यजजा,   राजेंद्र सोनकांबळे, माधव वसंत चव्हाण, चंद्रकांत पा तमलुरे,  प्रदीप देमेवार,  अतुल पा मंगरुळे,  अविनाश चव्हाण,  संजय भाऊ गुजलवार, सह सह्या करून  मागणी करण्यात आली आहे.
       इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या home वर क्लिक करा