भोकर :- (रमेश गंगासागरे ) जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी लॉक डाऊन नियमात ढिलाई दिली असतांनाही त्या ढिलाई मध्ये गैरफायदा घेऊन जास्त वेळ दुकाने चालू असल्याचे दिसून आल्यावरून सहा दुकानावर कारवाई करत ही दुकाने सिल करण्यात आली आहेत.
शहरात दुकाने बंद करण्याची वेळ ही सायंकाळी 5 पर्यंत नेमून दिलेली असतांनाही काही दुकानदार त्या वेळेचा गैरफायदा घेऊन उशिरापर्यंत आपली दुकाने उघडी ठेवून व्यापार करत आहेत, तर तहसीलदार यांची गाडी रोडवर आलेली पाहून काही चलाख दुकानदार लपाछपीचा खेळ खेळून प्रशाषणाची खिल्ली उडवत आहेत, काल दि, 23 जून रोजी सायंकाळी 5 च्या नंतर शहरात अशीच चलाख दुकाने
1) विलास कृषि सेवा केंद्र, किनवट रोड 2) राजेश कृषी सेवा केंद्र मेन रोड 3) बालाजी स्टील दुकान, 4) ताज मोबाईल शॉप,5) राजधानी फर्निचर, 6) श्रीराम ऑटोमोबाईल, चालू असतांना पथक प्रमुख श्री. सतीश जोहर (नायब तहसीलदार, उपविभागीय अधिकारी कार्यालय भोकर), श्री. बी. के. राऊत, श्री. गोविंद राचेवाड नगर परिषद तर्फे श्री. सचिन वैष्णव व पोलीस प्रशासन तर्फे श्री. बिरकलवाड यांना सोबत घेऊन ही कारवाई केली आहे.
इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या home वर क्लिक करा.


0 Comments