नायगांव (ता.प्र.) गंगाधर गंगासागरे 

           बिलोली तालुक्यातील केरुर येथील तरुणी आणि किनाळा येथील तरुणाचे एकमेकांवर प्रेम होते मात्र प्रियसी तरुणीचा विवाह चोडी तालुका धर्माबाद येथील तरूणा सोबत  रीतिरिवाजा प्रमाणे 29 मे रोजी करण्यात आल्यानंतर या प्रेमीयुगुलाने  पलायन करून देगलूर तालुक्यातील वझरगा येथील मन्याड नदीपात्रात दोघेही एकमेकांना ओडनीने बांधून आत्महत्या केल्याची घटना दि.२३ जुन रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास उघडकीस आली असून  या घटनेमुळे  शंकरनगर परिसरात एकच खळबळ उडाली असून या घटनेची रामतीर्थ पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
         बिलोली तालुक्यातील केरुर येथील भाग्यश्री पिराजी चिमणापुरे वय वर्ष १९ या  तरुणीचे आजूळ  किनाळा असुन ती शिक्षण घेण्यासाठी शंकरनगर येथील श्री साईबाबा विद्यालयात असल्याने ती अधुन मधुन आजोळी येन्याने येथील प्रविण त्र्यंबक कौठकर वय वर्ष २१  या तरुणासोबत प्रेम जडल्याने मागील काही दिवसापासून एकमेकावर प्रेम असताना हे प्रकरण कुणालाही माहित नसल्याने मुलीच्या  आई वडिलांनी आपल्या मुलीचा विवाह रीतिरिवाजा प्रमाणे चोडी तालुका धर्माबाद येथील तरूणा सोबत  दि.29 मे रोजी करून दिले परंतु या दोनीही प्रेमीयुगूलाच्या मना विरूध्द हा विवाह असल्याने  हि मुलगी सासर येथून माहेरी म्हणून आली असता ती दि.22 मे च्या मध्यरात्री घरातील सर्व मंडळी गाड झोपेत असताना ती घराबाहेर   निघून आपल्या प्रियकरासोबत पलायन केली.   आपल्या प्रियकरापासून आपले संबंध दुर होत असल्याचे दुःख तिच्या व त्याच्या मनात होते त्यामुळे त्यानी दिनांक 23 जून रोजी सदर युवती आणि किनाळा येथील तिचा प्रियकर यांनी पहाटे देगलूर रोड वरील वझरगाव येथील मन्याड नदीच्या नदिपात्रात नांदेड-देगलुर राज्यमहामार्गा पासून सुमारे शंभर फुट कोणाला दिसूनये अशा काटेरी झुडपानी सुमारे शंभर मिटर दुर पायी जाउन नदीपात्राच्या कडेला सदरील मुलीचा फोटो, मुलाचा आधार कार्ड, दोघाच्या पायातील वाहन आणी मुलीची ओडणी नदीच्या कडेला ठेवून दोघेही एकमेकांच्या कबंरेला ओडणीने गच्च  बांधुन शेवटची घटका एकमेकांच्या मिठीत घालत दोघांनीही नदिच्या मधोमध असलेल्या पाण्यात  जाउन या जगाचा निरोप घेतला. या घटनेची माहिती मिळताच रामतीर्थ  पोलिसांनी घटनास्थळी धाव घेउन घडलेल्या  घटनेचा रितसर  पंचनामा करून दोघांचेही मृतदेह  पाण्याबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी नायगाव येथील शासकीय रुग्णालयात  पाठवुन दिले.
        या घटनेमुळे  शंकरनगर परिसरात  खळबळ उडाली आहे . या घटनेची मुलीचे वडील मरीबा चिमनापुरे यांनी दिलेल्या फिर्यादी वरुण रामतीर्थ पोलिस ठाण्यात रात्री उशिरा  अकस्मीत मूत्युची नोंद करण्यात आली असून हि घटना समजताच बिलोली येथील उपविभागीय पोलिस अधिकारी सिध्देश्र्वर धुमाळ यांनी घटनास्थळी भेट देऊन घडलेल्या घटनेची पहानी केली असून या घटनेचा पुढील तपास सपोनि सोमनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली  करण्यात येत आसल्याचे सांगण्यात येते.
       ईतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या home वर क्लिक करा