भोकर :-रमेश गंगासागरे
चायनाने भारतीय सीमेलगत तणाव निर्माण करून वीस भारतीय सैनिकांना शहीद केल्यामुळे भोकर भाजपच्यावतीने जिनपिंग यांचा पुतळा जाळून चिनी मालाची होळी करण्यात आली.
मागील पंधरा दिवसांपासून चायनाने विनाकारण भारतीय हद्दीत प्रवेश करून भारतीय चौक्यांवर काही ठिकाणी ताबा मिळविल्या मुळे उद्भवलेल्या तणावात मोठी झडप निर्माण झाली त्यात, 20 भारतीय जवानांना आपल्या प्राणास मुकावे लागले, तर प्रति उत्तरादाखल भारतीय सैनिकांनी केलेल्या या झडपे मध्ये चाळीस ते पंचेचाळीस चीनी सैनिकांचा खातमा झाला. अगोदरच देश कोरोना सारख्या महामारीला तोंड देत असताना आता चीनने भारतीय भूभाग बळकावण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता,
पण भारतीय सैनिकांनी चीनची ही चाल यशस्वी होऊ दिली नाही, त्यामुळे सध्या तरी दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे, चिनी मालाचा बहिष्कार करावा म्हणून भोकर भाजपच्या वतीने येथील डॉक्टर आंबेडकर चौकात जिनपिंग यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले, असून चिनी मालाचीही होळी करण्यात आली आहे, यानंतर भोकर भाजपच्यावतीने तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले आहे, या निवेदनावर शेतकऱ्यांची कर्जमाफी तात्काळ करून नवीन कर्ज वाटप करण्यात यावे व शेतकऱ्यांच्या विविध अडचणीवर तात्काळ तोडगा काढण्या संदर्भात मागणी करण्यात आली आहे, सदरील अर्जावर तालुकाध्यक्ष किशोर पाटील लगळुदकर, दिलीप सोनटक्के, गणेश कापसे बटाळकर, जिल्हा परिषद सदस्य रेड्डी, नगरसेवक संतोष मारकवार, शेख अर्शदभाई, आकाश शिरसागर, डांगे,श्रीमती साबळे यांच्यासह असंख्य जणांच्या सह्या आहेत.
इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या Home वर क्लिक करा


0 Comments