नायगाव:- ( गंगाधर गंगासागरे ) 
        नायगाव तालुक्यात खरीपाच्या पेरणीला गेल्या आठ दिवसापासून  शेतक-यांनी सुरुवात केली असून काही गावात सोयाबीन बियाणे सीलबंद पाकिटातच सडलेले आढळून आले तर काहि ठिकाणी पेरणी करुनही बियाणे उगवली नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची तक्रार प्राप्त होताच उपविभागीय कृषीधिकारी एम.के. सोनटक्के व तालुका कृषी अधिकारी श्री काळे,पंचायत समितीचे कृषी अधिकारी श्री राजे यांनी प्रत्यक्षात धानोरा व होटाळा येथील शेतीची पाहणी केली व विद्यापिठाचे साईन्टीस व विशेष पथक मिळुन प्रत्यक्ष शेतात जाऊन पंचनामे करणार असल्याचे सांगितले आहे .
थेट शेतात जाऊन पाहणी करत असताना अधिकारी दिसत आहेत
       नायगाव तालुक्यातील धानोरा,  मरवाळी, कुंचेली तांडा,लालवंडी सह आदी गावात गेल्या आठ दिवसापासून सोयाबीन, मुग, उडीद आणि तुरीच्या पेरणीला सुरवात करण्यात आले असून मुग, उडीद आणि तुरची उगवन जोरात होत आहे परंतु सोयाबीन ग्रिरीन गोल्ड व अन्य  कंपनीचे उगवतच नसल्यामुळे येथील शेतकरी दिगांबर जळशिंगराव ,संग्राम सिदराम, शंकर देवराव, माधव तुळशीराम, रामा बापुजी याच्या तक्रारी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात प्राप्त झाल्याने आपल्या विशेष पथकातील उपविभागीय कृषीधिकारी सोनटक्के, नायगाव तालुका कृषी अधिकारी श्री काळे, पंचायत समितीचे कृषीधिकारी श्री राजे याच्या समवेत घटनास्थळी जाऊन प्रत्यक्षात शिवार पाहणी केली आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारी पुढील कार्यवाही साठी तालुक्यातील विशेष पथक व विद्यापिठाचे साईन्टीस मिळुन प्रत्यक्ष शेतात जाऊन पंचनामे करणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी श्री काळे यांनी दिली आहे.
           पहिल्याच पेरणीसाठी उसनवारीने पैसे काढून शेतकरी आपली पेरणी करीत आहेत त्यातच बियाणे उगवत नाही किंवा सीलबंद पॉकेटमधील बियाने सडलेल्या अवस्थेत आढळत आहेत यात शेतकऱ्यांना मोठा आर्थिक व मानसिक त्रास होत असून ज्या ज्या शेतकऱ्यांचे बियाणे उगवले नाही किंवा बियाणे पेरणी योग्य अवस्थेत आढळून आले नाही त्या शेतकऱ्यांना मोफत बियाणे व रासायनिक खत उपलब्ध करून पेरणीसाठी आर्थिक मदत करावी अशी मागणी नरसी पंचायत समिती गणाच्या सदस्या सौ.प्रतिभाताई धानोरकर यांनी केली असून यावेळी त्यांचे प्रतिनिधी परमेश्वर गुरुजी  धानोकर व ओम पा.धानोरकर तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते.

       इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या home वर क्लिक करा