भोकर :(रमेश गंगासागरे ) एका अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन अत्याचार केल्याप्रकरणी भोकर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीस दहा वर्षाची शिक्षा व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
       घटनेबाबत थोडक्यात माहिती अशी की, हिमायतनगर तालुक्यातील विरसनी या गावातील एका शेतकऱ्याची अल्पवयीन मुलगी हिस आरोपी तानाजी पाळजकार याने लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून मध्यप्रदेशात पळवून नेले होते, त्यास पळवुन जाण्यासाठी आरोपी नामे माधव दिगंबर पाळजकर, मारुती दिगंबर पाळजकर, अमोल विलास पाळजकर, शिवाजी सुरेंद्र पाळजकर यांनी आरोपी तानाजी माधवराव पाळजकर यास मध्यप्रदेश येथे पळून जाण्यासाठी मदत केली, होती या प्रकरणाने विरसनी ता. हिमायतनगर तालुक्यात खळबळ माजली होती, हिमायतनगर पोलिस स्टेशनला चार वर्षांपूर्वी नानाराव पुंजाराम कदम यांनी फिर्याद दिल्यावरून हिमायतनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 70/ 2016 कलम 363, 366, 376, 34 व 48 बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता, सदरील गुन्ह्याचा आज जिल्हा व सत्र न्यायालय भोकर येथे निकाल लागला असून न्यायमूर्ती श्री, मुजीब शेख यांनी आरोपी तानाजी माधवराव पाळजकर यास सदरील गुन्ह्यात दोषी ठरवून दहा वर्षाची शिक्षा 10 हजार रुपये दंड, अशी जबर शिक्षा सुनावली आहे, तर इतर आरोपींना सबळ पुराव्याअभावी मुक्त करण्यात आले आहे. सदरील गुन्ह्यात एकूण दहा साक्षीदार तपासण्यात आले होते, सरकारी पक्षातर्फे ॲडव्होकेट रमेश राजुरकर यांनी काम पाहिले.
       ईतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या home वर क्लिक करा