भोकर (रमेश गंगासागरे ):-
शहरातील ऐतिहासिक वारसा लाभलेला कैलास गड (दत्तगड) अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले असून आज ही या गडावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमने होत आहेत. हे अनाधिकृत असलेले अतिक्रमण हटविण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा देवदत्त दशनाम संन्यासी असोसिएशनने दिला आहे.
भोकर शहरातील कैलास गडावरील तलावात दरवर्षी गणेशाचे विसर्जन करण्यात येते. तिर्थक्षेत्र तसेच पर्यटन स्थळ असलेला कैलास गड सध्या अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. या पूर्वी महंत उत्तम बन महाराज यांनी अनेक वेळा मुख्याधिकारी यांना अतिक्रमण संदर्भात निवेदन ही दिली पण या निवेदनाकडे नगरपरिषदने दुर्लक्ष केले. यामुळे आज अतिक्रमण होत आहे. अतिक्रमण करतांना मोठ्या प्रमाणात खोदकाम होत असल्याने भविष्यात माळीन (पुणे) सारखी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे अनाधिकृत असलेले अतिक्रमण हटविण्यात यावे अशी मागणी देवदत्त दशनाम संन्यासी असोसिएशनने उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. जर हे अतिक्रमण हटविण्यासाठी टाळाटाळ झाली तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही या निवेदनात दिला आहे. या निवेदनावर कोलंबी संस्थानचे संतश्री १०८ महंत यदुबन गुरू गंभीरबन महाराज, देवदत्त दशनाम संन्यासी असोसिएशनचे अध्यक्ष सुर्यकांत गोस्वामी, उपाध्यक्ष संतश्री अवधुतबन गुरूशंकरबन महाराज, सचिव संतश्री शामगीर गुरू ऋषीगीर गीरी महाराज, संतश्री चैतन्यभारती गुरू महाराज, संतश्री मोतीगीर गुरू महाराज, संतश्री निर्गुणपुरी गुरू महाराज, संतश्री शांतिबन गुरू महाराज, संतश्री उत्तमबन गुरू महाराज यांच्या सह्या आहेत.
निवेदन दिल्यानंतर उपविभागीय अधिकारी पवन चांडक यांनी सदरील अतिक्रमणा संदर्भात नगरपरिषदेला सुचना देवून हे अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.
ईतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या home वर क्लिक करा.
शहरातील ऐतिहासिक वारसा लाभलेला कैलास गड (दत्तगड) अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले असून आज ही या गडावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमने होत आहेत. हे अनाधिकृत असलेले अतिक्रमण हटविण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा देवदत्त दशनाम संन्यासी असोसिएशनने दिला आहे.
![]() |
| उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले |

0 Comments