भोकर :(रमेश गंगासागरे ) मागील आठवड्यात पतंगाचा चायना मांजा लागून पत्रकार डोईफोडे हे गंभीर जखमी होऊन बालबाल बचावले होते, त्यांच्या गाल व हनुवटीवर 12 पेक्षा जास्त टाके पडले होते. 

      म्हणून चायना मांजा विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी नांदेड जिल्हाधिकारी यांना पत्रकार संवरक्षण समितीचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र गायकवाड यांनी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले होते, त्या नुसार काल दि, 15 जून रोजी भोकर येथील दोघांवर कलम 338 नुसार पोलीस कारवाई करण्यात आली आहे.

       याबाबत भोकर न्यूज लाईव्ह ने ही प्रथम वृत्त प्रकाशित केले होते या वृत्ताची सुद्धा इतर वृत्तपत्र व दैनिकांनी दखल घेऊन पत्रकार डोईफोडे यांना सहकार्य केले होते.