भोकर : (रमेश गंगासागरे ) मृग नक्षत्राच्या पहिल्याच पावसात भोकर रेल्वे गेट परिसरात प्रचंड पाण्याचे डबके निर्माण झाल्याने वाहनधारक व नागरिकांना पाण्यातूनच जावे लागत असल्याने तीव्र नाराजी पसरली आहे.
दिनांक 11 जूनच्या रात्री मृग नक्षत्राचा मोठा पाऊस बरसल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये आनंद बहरला, नागरिक व शेतकरी बाजारांमध्ये खरेदीसाठी ये-जा करत आहेत. पण भोकर नांदेड रोड वरील रेल्वे गेट जवळील रस्ता मागील पाच वर्षापासून तयार न झाल्याने त्या ठिकाणी पहिल्याच पावसात पाण्याचे मोठे डबके साचले आहे, त्यामुळे तेथून ये-जा करणाऱ्या नागरिकांना साचलेल्या पाण्या मधूनच जावे लागत आहे, तर असंख्य दुचाकी वाहनधारक त्या पाण्यामध्ये पडत असल्याने संबंधितावर नाराजी व्यक्त होत आहे, संबंधिताने सदरील पाण्याचे डबके बुजवून हा रस्ता वाहतुकीसाठी तात्काळ करावा अशी मागणी वाहन धारक, नागरिक व तेथील दुकानदाराकडून करण्यात येत आहे.
ईतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या home वर क्लिक करा.


0 Comments