नायगाव : (गंगाधर गंगासागरे )
रामतिर्थ पोलिसांची कारवाई, तीन आरोपींना अटक
नरसी येथून आपल्या मुनीमा सोबत रात्री ७ लाख २४ हजार रुपयांची रक्कम घेवून दुचाकीने कासराळीकडे जाणाऱ्या व्यापाऱ्यास हवेत गोळीबार करून लुटणाऱ्या तीन दरोडेखोरांच्या मुसक्या पोलिसांनी अवघ्या दीड तासातच आवळल्या.
या घटणेबाबत अधिक माहिती अशी की, रोड रॉबरी करण्याच्या उद्देशाने आलेले आरोपी मिर्झा सब्बर बेग गफार बेग वय ३२ वर्ष रा.देगलूर नाका,नांदेड, २ ) सुनील सुरेश सुळगेकर वय २० वर्ष रा. बंदाघाट, ३ ) शेख मोईज शेख महेमूद वय २२ रा.देगलूर नका नांदेड, या तिन्ही आरोपींना अटक करून कलम ३९४,३९७,३/२५ गुन्हेची नोंद करण्यात आली. सदरील गुन्ह्यात गुन्हेगाराने वापरलेला चाकू व मोटारसायकल सापडली तर इतर हत्यारांचा शोध सुरू असून आरोपीकडे रिवाल्वर असल्याची खात्रीलायक माहिती व्यापाराने पोलिसांना सांगितले आहे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ शिंदे, गणपत राठोड, शिवाजी क्षिरसागर, विलास भोळे, व्यंकट बोडके व अन्य त्यांचे सहकारी पोलिसांनी सापळा रचून मोठ्या हिमतीने आरोपीला जेलबंद करून आरोपीची दुचाकी गाडी क्रमांक MH AW - ९७१३ ही मोटार वाहन ताब्यात घेतले असून रामतीर्थ पोलिसांनी सदरील आरोपीला न्यायालयात हजर केले असता तिन्ही आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. तर पुढील तपास रामतीर्थचे स्पोनी एस.व्ही. शिंदे करीत आहेत.
दरम्यान कासराळी येथील व्यापारी संजय व्यंकटेश उपलंचवार यांचे मुखेड येथील एका व्यापाऱ्याकडे ७ लाख २४ हजार रुपये येणे होते. त्यामुळे उपलंचवार यांचा मुनीम आनंदा हा ( ता. १) जुन रोजी सोमवारी सायंकाळच्या दरम्यान मुखेड येथे गेला होता. तेथून रक्कम घेवून एका ओळखीच्या वाहणात बसून रात्री नरसी येथे आला व कासराळीला जाण्यासाठी वाहण नसल्याने त्याने मालक उपलंचवार यांना फोन लावला व मी नरसीला आलो असल्याची माहिती दिली. मालक येईपर्यंत मुनीम आनंदाने बसस्थानकात गेला होता. तेवढ्यात नांदेडहून मोटारसाकलवर आलेल्या तिघांची नजर आनंदावर पडली. हातात असलेली बँग व त्याच्या संशयास्पद हालचाली पाहता या तिघांनी त्याच्यावर हल्ला करण्याच्या अगोदरच मालक उपलंचवार हे आनंदाला घेण्यासाठी मोटरसायकलवर नरसीला आले.
मालक व मुनीम दोघे कासराळीकडे जात असतांना मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी पाठलाग सुरु केला व नरसीपासून एक कि. मी. अंतरावर लोहगावच्या घाटात मोटारसायकल अडवली व मुनीमाच्या हातातील पैशाची बँग हिसकावण्याचा प्रयत्न केला. मुनीम बँग सोडत नसल्याने त्याला चाकूचा धाक दाखवण्यात आला. त्यामुळे मुनीम बँग सोडून जिवाच्या आकांताने बाजूच्या शेतात पळाला. पण मालक उपलंचवार यांनी मात्र दरोडेखोरांचा निकराने सामना करत तिघापैकी एका दरोडेखोराला जखडून ठेवले होते. त्यामुळे दुसऱ्या दरोडेखोरांने हवेत गोळीबार केला. त्यावेळी मात्र उपलंचवार यांनी भितीने घट्ट पकडलेल्या दरोडेखोराला सोडून दिले. पैशाची बँग हस्तगत केल्यानंतर तिनही दरोडेखोरांनी त्यांची मोटारसायकल जाग्यावरच सोडून लोहगाव शिवारातील शेतात धुम ठोकली.
उपलंचवार यांनी घटना स्थळावरुन लोहगाव गाठले व तेथील काहींना घडलेली घटना सांगितली. त्यामुळे लोहगावच्या नागरिकांनी रामतीर्थ पोलीसांना संपर्क साधून घटना सांगितली व दरोडेखोर कोणत्या दिशेने गेले याचीही माहिती दिली. घटनेची माहिती समजताच रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सपोनि सोमनाथ शिंदे हे फौजफाट्यासह तत्काळ दरोडेखोरांच्या शोधत निघाले. नागरिक आणि पोलीसांच्या शोधमोहीमेत रात्री उशीरा तीनही दरोडेखोरांच्या नरसी शिवारात मुसक्या आवळण्यात पोलीसांना यश आले. ज्या मोटारसायकलवरून तीन दरोडेखोर आले ती मोटारसायकल चोरीची असल्याचे माहिती पुढे येत आहे, रोड रॉबरी ची घटना समजताच पोलीस अधीक्षक, अतिरिक्त अधीक्षक यांनी घटनास्थळी रात्रीच भेट दिली होती .
इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या home वर क्लिक करा

0 Comments