भोकर :(रमेश गंगासागरे ) सर्वत्र लॉकडाऊन असताना भोकर शहरात काही हॉटेल व्यावसायिक लॉक डाऊनचे नियम पायदळी तुडवून व्यवसाय करत असल्याचे आढळून आले यावरून 8 व्यावसायिकावर महसूल विभाग आणि नगरपरिषदेने आज सामूहिक दंडात्मक कारवाई केली आहे.
     
संग्रहित छायाचित्र
नांदेडचे जिल्हाधिकारी श्री विपिन इटनकर यांनी काही प्रमाणात लॉक डाउन शिथिल करत नियमावली जाहीर केली आहे, त्या नियमांमध्ये विविध प्रकारच्या दुकानदारांना व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात आली आहे, मात्र अनेक दुकानदार नियमाची पायमल्ली करत भोकर शहरात दुकाने बिनधास्तपणे उघडून व्यवसाय करत आहेत, त्यामुळे सोशल डिस्टंसिंग चा अभाव दिसून येत असल्याने covid-19 सारखी महामारी पसरण्याची दाट शक्यता असल्यामुळे असा व्यवसाय करणाऱ्या डोंगरे हॉटेल रिंग रोड,  चंदा हॉटेल, नरसिंह हॉटेल, मराठवाडा चिकन बिर्याणी , यांच्यासह वडापाव विकणाऱ्या हात गाड्यावर सुद्धा आज दिनांक  15 जून रोजी महसूल प्रशासन व नगरपरिषद कार्यालय भोकर यांच्या वतीने सामूहिक कारवाई करत एकूण 8 हॉटेल व्यावसायिकांवर कारवाई करून त्यांच्याकडून 3 हजार 700 रुपयांची वसुली करण्यात आली आहे. त्यामुळे नियमांचा भंग करून व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.
        5 वाजल्यानंतर शहरात कोणतेही दुकान चालू असल्यास त्यांच्यावर सुद्धा मोठी दंडात्मक कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे, तरी जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिलेल्या नियमाचा भंग करू नये व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन शेवटी करण्यात आले आहे.

ईतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेले home दाबा