भोकर :(रमेश गंगासागरे ) मागील 65 दिवसापासून शेतकऱ्यांची कापसाची बिले प्रलंबित असल्याने अनेक शेतकरी लॉक डाऊन मध्ये परेशान असल्याने त्यांची बिले तात्काळ देण्याची मागणी मराठवाडा जनता विकास परिषदेचे तालुकाध्यक्ष इंजिनीयर विश्वंभर पवार यांनी मुख्यमंत्री व पालक मंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
       
तहसीलदार यांना निवेदन देताना इंजिनीयर विश्वंभर पवार व  इतर  छावाचे कार्यकर्ते दिसत आहेत
      मागील १० मार्च  पासून शेतकऱ्यांचा कापूस  नाफेड ने खरेदी केला, त्या कापसाची बिले अजून देखील जमा केलेले नाहीत, म्हणून हा शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत असून ते आत्महत्येच्या छायेत आहे, म्हणून शासनाने शेतकऱ्यांच्या खरेदी केलेल्या कापसाची बिले तात्काळ द्यावी या आशयाचे निवेदन मुख्यमंत्री आणि नांदेडचे पालकमंत्री यांना  बुधवार दिनांक  20 मे रोजी तहसीलदार भोकर यांच्यामार्फत पाठविण्यात आले आहे, तसेच शासनामार्फत हळद खरेदी केंद्र सुरु करावे असे निवेदन मुख्यमंत्री कार्यालयाला तहसीलदार भोकर मार्फत मराठवाडा जनता विकास परिषद चे तालुकाध्यक्ष इंजिनीयर विश्वंभर पवार यांनी दिले आहे. या निवेदनावर डॉक्टर राजू एकाळे, शिवराज स्वामी, धनराज पाटील मोघाळी कर, अरविंद कपाटे, परमेश्वर सावळे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यावेळी छावाचे तालुकाध्यक्ष परमेश्वर सावळे यांनीदेखील शासनाकडे शेतकऱ्यांची मागणी तात्काळ मान्य करा  व शेतकऱ्याच्या मालाला बाजारात येताच बाजार भाव निम्म्यावर येत आहे त्यामुळे हळद, कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा, गहू इत्यादी पिकांची शासनामार्फत खरेदी करून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबवावी अशी विनंती केली आहे, मागणी तात्काळ मान्य न केल्यास  छावा स्टाईलने शेतकऱ्यासाठी तीव्र आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे.

ईतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या HOME क्लिक करा