भोकर :(रमेश गंगासागरे ) किरकोळ कारणावरून दलित महिलेच्या घरात घुसून तिला व तिच्या मुलास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून जबर मारहाण केल्यामुळे भोकर ठाण्यात एकावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेबाबत थोडक्यात माहिती अशी की, आज दि, 27 मे रोजी दुपारी भोकर येथील शहीद प्रफुल कुमार गोवंदे (चिखलवाडी) भागात राहणाऱ्या एका दलित महिलेच्या घरात जबरदस्तीने प्रवेश करत आरोपी नामे अब्दुल अजीज याने अत्यंत खालच्या दर्जाची अर्वाच्य भाषा वापरत तुझा छोटा मुलगा कुठे आहे, त्याने मला मारले आहे, आता त्याला मी सोडणार नाही, असे म्हणून दलित महिला व तिच्या छोट्या मुलास जबर मारहाण केली, आरोपी एवढ्यावरच न थांबता महिलेच्या छोट्या मुलास जमिनीवर पाडून डोक्यात व लाथाबुक्क्यांनी मोठ्याप्रमाणात मारहाण केली व गल्लीमध्ये दहशत निर्माण केली, त्यामुळे दलित महिलेचा मुलगा या मारहाणीत जबर जखमी झाला आहे, सदरील पीडित महिला वंदना देविदास हणमंते यांनी भोकर ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अब्दुल अजीज विरोधात रात्री उशिरा अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा तसेच कलम 323, 504, 506 भा. द. वि. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दलित परिवार आणि आरोपी अब्दुल अजीज यांच्यात आज सकाळीच किरकोळ वादातून भांडणे झाली होती, या भांडणात परस्परविरोधी गुन्हे भोकर ठाण्यात दाखल झाली, त्यानंतर दोघेही जामिनावर सुटल्यानंतर सकाळच्या भांडणाचा राग मनात धरून दुपारी आरोपी अब्दुल अजीज याने दलित परिवाराच्या घरी जाऊन अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत, घरात घुसून जब्बर मारहाण केली, त्यामुळे त्याच्यावर भोकर ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, ह्यापूर्वी सुद्धा अब्दुल अजीज याच्याविरोधात भोकर ठाण्यामध्ये विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळत आहे.
इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या home वर क्लिक करा
इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या home वर क्लिक करा

0 Comments