भोकर :(रमेश गंगासागरे ) कोरोनाव्हायरस संबंध भारतभर पसरला असल्याने भारत सरकारने सगळीकडे लॉक डाऊन वाढवले आहे, त्यामुळे हातावर पोट असलेले गरीब मजूर यांची मोठ्या प्रमाणावर उपासमार होत आहे, आता लॉक डाऊनचे तिसरे सत्र चालू असून तिसऱ्या सत्रातही गरिबांची उपासमार होऊ नये
म्हणून शहरातील काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष हमीद खान पठाण यांच्यावतीने गरीब व गरजू लोकांना अन्नधान्य व भाजीपाल्याच्या किटचे दररोज वाटप करण्यात येत आहे, पण त्यांनी किट वाटप करण्यात आलेल्या गरजू नागरिका सोबत कधीही फोटो सेशन केलेले नसून सोशल व प्रिंट मीडिया पासून ते नेहमीच दूर राहिले आहेत.
![]() |
| संग्रहित छायाचित्र |
भोकर शहरात अनेक व्यापारी सामाजिक संघटनेच्या वतीने पाल ठोकून बसलेल्या व परराज्यातील नागरिकांची उपासमार होऊ नये म्हणून त्यांना जेवणाचा डब्बा पुरवण्याचे काम करताना दिसून येत आहेत, यात भोकर चे जिल्हा न्यायाधीश श्री मुजीब शेख, सावली प्रतिष्ठान, इंजिनीयर विश्वंभर पवार व नाम फाउंडेशन च्या वतीने अन्नदानाचे महान कार्य भोकर शहरात पार पडत आहे, तसेच नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले, सामाजिक कार्यकर्ते हमीद खान पठाण हे वेळोवेळी अनेक नागरिकांच्या मदतीला धावून येणारे असून ते पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक म्हणून समजले जातात. त्यांनीसुद्धा ह्या सामाजिक लढ्यात आपले योगदान देत असून मागील एका महिन्यापासून गोरगरीब जनतेला अन्नधान्य व भाजीपाला असलेली किट वाटप करताना दिसून येत आहेत, त्यामुळे सर्वत्र या सर्व सामाजिक कार्यकर्ते व व्यापाऱ्यांचे तालुका भरातून अभिनंदन होत आहे.


0 Comments