उमरी :(रमेश गंगासागरे ) उमरी जिल्हा नांदेड येथे आज जिल्हा शल्यचिकित्सक नांदेड यांनी दिलेल्या माहिती मध्ये एकाच कुटुंबातील चार रुग्णांचा समावेश असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

       जिल्हा भरा मध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना उमरी मध्ये आत्तापर्यंत एकही रुग्ण आढळून आला नव्हता, आज अचानक जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड यांनी उमरी मध्ये चार कोरोना रुग्ण कोवीड -19 असल्याचे जाहीर केल्याने उमरी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे, सदरील चार रुग्ण एकाच कुटुंबातील असण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे, चार रुग्णांपैकी एक 9 वर्ष दुसरा 14 वर्ष, तिसरा 48 वर्ष तर चौथा 54 वर्षाचा पुरुष असल्याचे कळते, त्यामुळे उमरी शहरांमध्ये 27 मे आणि 28 मे रोजी जनता कर्फ्यू असल्यामुळे नागरिकांनी सलग दोन दिवस घराच्या बाहेर पडू नये व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

यासह