भोकर :(रमेश गंगासागरे ) तिसऱ्या लॉक डाऊन मध्ये कोरोना पेशंट भोकर मध्ये सापडल्याने खळबळ उडाली होती त्या कोरोना पेशंटवर भोकर येथील कोविड  सेंटरमध्ये दहा दिवसापासून उपचार चालू होते त्याची तब्येत ठणठणीत असल्यामुळे त्यास आज सुट्टी देण्यात आल्याने भोकर शहरात आनंद व्यक्त होत आहे.
संग्रहित छायाचित्र

       भोकर तालुक्यासाठी आज आनंदाची बातमी हाती आली असून भोकर शहरातील एकमेव कोरोना रुग्णास आज सुट्टी देण्यात आली आहे, सदरील कोरोना रुग्णावर भोकर येथील कोरोना सेंटरमध्ये मागील दहा दिवसांपासून उपचार सुरू होते, त्यास कोरोना कसलेही लक्षणे दिसून आली नाहीत त्याची तब्येत ठणठणीत असल्याने डॉक्टरांनी त्यास सुट्टी देण्याचा निर्णय घेत, त्यास 14 दिवस कोविड सेंटरमध्ये न ठेवता सेंटरमधून आज दुपारी सुट्टी देण्यात आल्याने भोकर वासियांचा जीव भांड्यात पडला आहे, भोकर वासियांनी सोशल डिस्टन्स, हँडवॉश, मास्कचा नेहमी वापर करावा व काळजी घ्यावी असे तालुका आरोग्य अधिकारी भोकर यांनी सूचित केले आहे, कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये अफवा पसरवू नये तसेच प्रशासनाला सहकार्य करावे असे म्हटले आहे, प्रत्येक नागरिकांनी आपल्या मोबाईल मध्ये आरोग्य शेतु अँप डाऊनलोड करून त्याचा उपयोग करावा असे म्हटले आहे.

ईतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या home वर्क क्लिक करा