अर्धापुर :(नकुल जैन ) तालुक्यातील कोढा येथील आत्महत्या ग्रस्त शेतकरी स्व. केशव दत्तरामजी कदम यांची मुलगी चि.सौ.का.काशिबाई केशव कदम यांचा चि.संदीप उत्तमराव राजेगोरे यांचा  विवाह सोहळा २४ रोजी रविवारी अर्धापूर येथील एका शाळेत पार पडला.
       आत्महत्या ग्रस्त शेतकरी श्री केशव कदम कुटुंबीयांनी जीवनातील अनेक आवाहन पार पाडीत दोन मुलीचे विवाह पार पाडले तर काही दिवसांपूर्वी केशव यांच्या एकुलता एक मुलांचे निधन झाले, त्यामुळे खचलेल्या कुटूंबियांना अनेकांनी आधार देत धिर दिला, अशातच छोटी मुलगी काशीबाई हिच्या विवाहाची चिंता सत्तावत होती, काशीबाई हिचा विवाह धुमधडाक्यात मेळाव्यात करण्यासाठी अनेकांनी आधार देण्याचे ठरवले होते पण, कोरोना ससंर्गामुळे शासनाने लाॅकडाउन केल्यामुळे नियोजीत विवाह टळला, त्यामुळे कदम कुटुंबीय चिंतेत होते, या लाॅकडाऊन मध्ये विवाह सोहळा पार पाडण्यासाठी शासनाने पूर्वी  बंदी केली व नंतर  विवाह  ५० लोकात  करण्याची परवावानगी दिली. पण कदम  मंडळीं विवाह कुठे व कसा करावा या चिंतेत होती. याबाबत माहिती  गटनेते अॅड किशोर देशमुख यांना मिळताच त्यांनी कदम कुटूंबियांची भेट घेऊन राजेगोरे कुटुंबियांना बोलून हा  लग्न सोहळा अक्षरागंण शाळेत ठेऊन सगळी व्यवस्था करण्याची हमी दिली. दोन्ही परिवाराने होकार दिल्याने  दि.२४ रविवार रोजी सकाळी ७ वाजता शासनाचे सर्व नियम पाळून सोशल डिसटंन्स, सर्वांना सॅनिटाइजर, मास्क इ उपाययोजना केल्या, हा विवाह सोहळा माजी जि.प.सदस्य धर्मराज देशमुख, नगरपंचायत गटनेते अँड. किशोर देशमुख, अँड.बालाजी कदम, हरिभाऊ कदम  यांच्या उपस्थितीत पार पडला या वेळी पत्रकार निळकंठ मदने, लक्ष्मीकांत मुळे, नागोराव भांगे, सखाराम क्षीरसागर, तालुकाध्यक्ष बालाजी स्वीमी, तुळशीराम बंडाळे, आनंद वैद्ये, संतोष पवार, विजय कल्याणकर, बंडू कदम यांच्या उपस्थिती होती. या विवाह सोहळ्यास उपस्थितीत असलेल्या सर्व मंडळींना रसाळी भोजन करण्यात आले होते. या विवाह सोहळ्यासाठी एक रुपया न घेता विना खर्च लग्नास होकार  देणाऱ्या राजेगोरे कुटुंबीया मुळे या अगळ्या वेगळ्या विवाह सोहळ्याची चर्चा तालुका भर होत होती. हे नातेसंबंध व विवाह पार पाडण्यासाठी अँड. बालाजी कदम व  बबन कदम यांनी अथक परिश्रम घतले.

ईतर बातम्या वाचण्यासाठी खालील दिलेले Home दाबा