नायगाव :(गंगाधर गंगासागरे ) 
       विना अच्छादन उघड्या ट्रकमधून वीट आणि गौण खनिजांची वाहतूक दिवसाढवळ्या होत असताना रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या दुचाकीस्वारांचा डोळ्यात ट्रकमधील धूळ उडून जात असल्याने दुचाकी चालकात संताप व्यक्त केला जात आहे.
उघड्या ट्रकमधून अशाप्रकारे वाहतूक होत आहे
       येथून जवळच आसलेल्या श्रीक्षेत्र राहेर ता.नायगांव, चिरली व गागलेगाव ता.बिलोली परीसरातील विट भट्टी चालक हे आपल्या ट्रक आणि टेंपोद्वारे उघडपणे बिनभोबाट  मुख्य रस्त्यावरून वीट, मुरूम, वाळू वाहतुक करीत आसल्यामुळे दुचाकीस्वारासह नागरीकांच्या डोळ्यांत हा धुराळा उडत आहे. तसेच रस्त्यावर बारीक वाळू आणि मुरूम सांडत असल्यामुळे  मोटरसायकल स्लिप होऊन रस्त्यावर मोठा अपघात होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे, म्हणून बिलोली व नायगाव तालुक्यातील महसूल प्रशासनाने वेळीच अशा ट्रक व टेम्पोवर कार्यवाही करून दुचाकीस्वारांना दिलासा द्यावा अशी मागणी केली जात आहे.

ईतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या home वर क्लिक करा