भोकर :(रमेश गंगासागरे ) मौजे नागठाणा तालुका उमरी जिल्हा नांदेड येथील बाल तपस्वी दुहेरी हत्याकांडातील आरोपी लींगडे यास आज दिनांक 29 मे रोजी उमरी येथील न्यायालयात उभे केले असता त्यास न्यायाधीशांनी तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
नागठाणा येथील बालतपस्वी व त्यांच्या शिष्याच्या हत्याकांडाने संबंध जिल्हा हळहळला होता दुहेरी हत्याकांड करून आरोपी लिंगडे याने तेलंगाना येथे रातोरात पळ काढला होता, त्यास तेलंगाना पोलिसांनी काही तासातच जेरबंद करून महाराष्ट्र पोलिसांच्या ताब्यात दिले होते, महाराष्ट्र पोलिसांनी आरोपी लिंगडे यास तेंव्हा अटक करून भोकर येथील न्यायालयाचे न्यायाधीश सौ तळेकर मॅडम यांच्यापुढे हजर केले होते, तेव्हा बालतपस्वी यांच्या हत्याकांडात (गुन्हा क्रमांक 117 )त्यास 29 मे पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली होती, पहिल्या हत्याकांडातील पोलीस कोठडी आज 29 रोजी संपत आली असल्याने, त्यास लगेच दुसऱ्या हत्याकांडातील ( गुन्हा क्रमांक 118 ) गुन्ह्यात उमरी येथील न्यायालयाने परत तीन दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
![]() |
| खाली बसलेला हाच तो दुहेरी हत्याकांडातील आरोपी |
पहिल्या गुन्ह्यात मोबाईल चार्जिंग च्या वायरने गळा आवळून बालतपस्वीविंची हत्या केल्याचे निष्पन्न झाले होते, आता त्यांच्या शिष्या ची हत्या आरोपीने कशा पद्धतीने केली हे उघड होईल.
इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या होम वर क्लिक करा
इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या होम वर क्लिक करा

0 Comments