भोकर :(रमेश गंगासागरे ) 

शेजारील 50 नागरिकांना त्यांच्या राहत्या घरातच केले होम कोरंटाइन

     
        काल कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण भोकर शहरात सापडल्यामुळे भोकर करांची झोप उडाली होती आज त्या रुग्णाची संबंधित जवळच्या तीन नातेवाईकांना भोकर येथील कोरोना केअर सेंटर येथे कोरं टाईम करण्यात आले असून त्यांच्या राहत्या घराच्या आसपासच्या पन्नास नागरिकांना कालपासून त्यांच्या घरीच कोरनटाईन करून त्यांच्यावर देखरेख करण्यात येत आहे.
       आतापर्यंत भोकर मध्ये बाहेर गावावरून आलेले तसेच ग्रामीण भागांमध्ये 4 हजार 293 तसेच शहरी भागांमध्ये 805 व्यक्तींना होमकोरर्टाईन करण्यात आले असल्याची माहिती डॉक्टर राहूल वाघमारे तालुका आरोग्य अधिकारी भोकर यांनी कळविले आहे, ताब्यात घेण्यात आलेल्या रुग्णांना भोकर येथील कोविंड केअर सेंटर, शासकीय समाज कल्याण वस्तीगृह किनवट रोड भोकर येथे देखरेखीखाली व ईलाजास्तव ठेवण्यात आले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे व अत्यावश्यक कामाशिवाय घराच्या बाहेर पडू नये, असेही तालुका आरोग्य अधिकारी यांनी कळविले आहे, तसेच सर्व नागरिकांनी आपल्या मोबाईल मध्ये आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करून आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास सदर ॲप फायदेशीर ठरते असे तालुका आरोग्य अधिकारी यांनी सूचित केले आहे.

ईतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेले Home दाबा