नायगाव :(गंगाधर गंगासागरे ) नायगांव जिल्हा नांदेड येथील भारत जिनिंगला गुरुवार दि.28 मे च्या रात्री अकरा वाजेच्या सुमारास आचानकपने भीषण आग लागली. या आगीत लक्षावधी रुपयांचा कापूस जळून खाक झाल्याची माहिती पुढे येत आहे.
रात्री आग लागल्याची माहीती कळताच न.प.अग्नीशमन दलाची एक गाडी घटनास्थळी दाखल झाली मात्र ही भिषण आग अटोक्यात आणणे अशक्य झाल्याचे घटनास्थळावरील लोकांकडून सांगण्यात येत होते .भारत जिनिंग ही डी.बी. पाटील होटाळकर यांच्या मालकीची असून या जिनिगमध्ये मुखेड, देगलूर, कंधारसह नायगांव तालुक्यातील शेतकर्यांचा कापसू मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात येत असतो. आजघडीला या जिनिंगमध्ये खरेदी झालेला व विक्रीस आलेला जवळपास वीस ते पंचविस हजार क्विंटल कापुस व कापसाच्या गोणी इथे होत्या, तेथे आचानक आग लागली . लोकांना काही समजण्यापूर्वीच आगीने मोठा पेट घेत उग्ररुप धारण केले.
आगीच्या घटनेची माहिती मिळताच नायगाव नगर पंचायतची अग्नीशमनची गाडी दाखल झाली.परंतु एका गाडीवर आग अटोक्यात येणे अशक्य होते . काही वेळाने जिल्ह्यातील अग्नीशमन दलाच्या इतर तीन गाड्या दाखल झाल्या त्यामुळे आगीचे तांडव आटोक्यात आले . मात्र
या आगीत लक्षावधी रुपयाचा कापूस जळाला आसल्याचे सांगण्यात येत आहे . पण आगीचे कारण कळू शकले नाही.
दरम्यान. आग विझवण्यासाठी सकाळपर्यंत देगलुर , मुखेड , कंधार , अहमदपूर , नायगांव येथील अग्निशामक दलाच्या गाड्या आग विजवायला आल्या होत्या . सकाळी सहा वाजेपर्यंत आग विजविण्याचे कार्य सुरु होते. आगीची घटना समजताच नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सकाळी जिनिंग ला भेट दिल्याचे कळते.
ईतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या home वर क्लिक करा
![]() |
| आग लागल्यानंतर जिनिंग अशी भयानक दिसत होती |

0 Comments