भोकर :(रमेश गंगासागरे ) सध्या सर्वत्र लॉकडाऊन चालू असल्यामुळे लग्नाच्या तारखा पुढे ढकलल्या जात आहेत तर काहीजण सवडीनुसार कोणताही गाजावाजा न करता लग्न सोहळे उरकून घेत आहेत त्यामुळे हातावर पोट असणार्‍या भोकर येथील बँड बाजा पथकाची मोठ्या प्रमाणावर उपासमार होत आहे.
निवेदन देताना वाजंत्री दिसताहेत

      भोकर येथील गोदावरी ब्रास बँड कंपनी मध्ये वीस ते पंचवीस कलाकारांचा समावेश असून हे सर्व जण आपला पारंपारिक व्यवसाय करुन आपले व आपल्या कुटुंबाचे पोट भरत असतात, दरवर्षी त्यांना लग्नसराईमध्ये लग्नाच्या काही तारखा मिळत असल्याने, लग्नात वाजंत्री म्हणून हे सर्वजण अल्प मानधनावर काम करत असतात.
 
       आता देशभरात कोरोना, covid-19 मोठ्या प्रमाणावर पसरला असल्याने भारत सरकारने मागील 24 मार्चपासून जनता कर्फ्यू आणि त्यानंतर लॉक डाऊन केल्यामुळे, ह्या व्यवसायिक वाजंत्री लोकांची मजुरी बुडून खूप मोठे नुकसान झाले आहे, त्यामुळे ह्या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. म्हणून गोदावरी ब्रास बँड कंपनीतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री अशोकराव चव्हाण आणि भोकरचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले असून या निवेदनामध्ये उपासमारी होत असल्याने शासनाने त्वरित मदत द्यावी या आशयाचे निवेदन दिले आहे, निवेदनावर ब्रास बँड कंपनीचे रामदास गाडेकर, प्रल्हाद गाडेकर, मुकिंदा गाडेकर, दत्ता हुपाडे, रामचंद्र पडोळे, सुभाष गाडेकर, भगवान गाडेकर, ज्ञानेश्वर गाडेकर, भीमराव सावते, सुभाष गाडेकर, नितीन गाडेकर यांच्यासह अनेक वाजंत्री लोकांच्या सह्या आहेत.

ईतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या Home वर क्लिक करा