नायगाव :(गंगाधर गंगासागरे ) दारुच्या नशेत घरामधे सतत भांडन करत गोंधळ घालणाऱ्या पित्याचा पोटच्या मुलानेच खुन केल्याची खळबळजनक घटना अटकळी ता.बिलोली येथे  26 मे रोजी सायंकाळी  7 वाजण्याच्या सुमारास घडली .
       या घटने बाबत पोलीस सुत्रांनी दिलेली अधिकची माहीती की , अटकळी ता.बिलोली येथील मारोती पिराजी रघुपती वय ४० (मयत) हा दररोज दारु पिवून घरी यायचा व मुलासोबत तसेच पत्नी सोबत कोणत्याही कारणाहून वाद घालून भांडन व मारझोड करायचा, याचा राग मनात धरुन पोटचा मुलगा भुमाजी मारोती रघुपती वय २० याचे दिनांक २६ मे रोजी सायंकाळी पुन्हा वडिलांसोबत भांडन लागले, झटापट झाली व रागाच्या भरात मुलाने चाकूने वार करून खुन केला.
      ह्या घटनेची माहीती कळताच रामतिर्थ पोलीसांनी घटनास्थळावर हजर होऊन पंचनामा केला. फिर्यादी पारुबाई मारोती रघुपती वय ३७ (मयताची पत्नी) हिच्या तक्रारीनूसार मुलगा भुमाजी यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास तात्काळ  अटक करण्यात आली आहे. दिलेल्या फिर्यादीवरून गुरन ८८/२० भादवि ३०२ नुसार गुन्हा नोंद केला आहे . या घटनास्थळी बिलोलीचे  उपविभागीय पोलीस अधिकारी सिध्देश्वर धुमाळ यांनी भेट दिली असून पुढील तपास सपोनि एस.व्ही. शिंदे हे करी आहेत.