बारड :(पिराजी गाडेकर ) विजेचा शॉक लागून लाईनमन कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक २१ रोजी दुपारी 2 वाजता घडली असून याप्रकरणी बारड पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की, बारड येथील रहिवासी असलेला लाईन काम करणारा कामगार तरुण इंद्रजीत मोहनराव गायकवाड वय ३७ वर्षे रा.डॉ. बी.आर.आंबेडकरनगर बारड, हा नेहमीप्रमाणे शेंबोली शिवारात लाईन काम करण्यासाठी गेला होता, त्याठिकाणी डीपी वरती अर्थिंग पट्टी घेऊन काम करत असताना अचानक वारा आल्याने इंद्रजित गायकवाड यांच्या हातातील जी अर्थिंग ची पट्टी बाजूने जाणारे ११ के.व्ही.ए. या विद्युत तारेवर पडल्याने त्यास विजेचा जबरदस्त शॉक लागल्याने तो वरून खाली पडला होता,
त्यास तातडीने बारड येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यास मृत् घोषित केले. संपूर्ण बारड आणि बारड परिसरात याविषयी हळहळ व्यक्त होत आहे, दि.२२ रोजी सकाळी नऊ वाजता शोकाकुल वातावरणात सार्वजनिक स्मशान भूमीमध्ये त्याच्यावर अंत्यविधी करण्यात आला. खंडू रामजी बरकमकर व्यवसाय लाईमेन कामगार रा.बारड यांच्या फिर्यादीवरुन कलम १७४ सी.आर. पी.सी.प्रमाणे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, पुढील तपास स.पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.काँँ.सुनिल आडे हे करीत आहेत.
ईतर बातम्या वाचण्यासाठी खाली असलेल्या Home वर क्लिक करा

0 Comments