भोकर :(रमेश गंगासागरे ) येथील सामाजिक कार्यकर्ते मारोतराव गोरटकर यांची जेष्ठ कन्या कु. सायली गोरठकर आणि औंढा नागनाथ येथील उच्च शिक्षित तरुण आकाश रमेश धोतरे यांचा विवाह रविवार दिनांक 24 मे रोजी सकाळी 11:30 वाजताच्या दरम्यान भोकर येथे अत्यंत साधेपणाने पार पडला.
सध्या सर्वत्र कोरोना, कोविड-19 महामारीने थैमान माजवले असल्याने कोविंड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन अनेक सार्वजनिक कार्यक्रमाला परवानगी देत नाही, त्यामुळे मारोतराव गोरठकर यांनी आपल्या मुलीचा विवाह शासकीय नियमाप्रमाणेच करण्याचे ठरवले यात सोशल डिस्टन्स, सर्व पाहुण्यांचे हँडवॉश, शैनेटायझर चा योग्य वापर करत, अत्यंत मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत साधेपणाने हा विवाह सोहळा भोकर येथील त्यांच्या राहत्या घरी, विश्वकर्मा नगर येथे पार पडला. या कार्यक्रमास भोकर नगरीचे माजी नगराध्यक्ष विनोद पाटील, सामाजिक कार्यकर्ते संभाजी चेरकेवाड, जय भीम पाटील, यांच्यासह काही मोजकेच पाहुणे उपस्थित होते, लग्नानंतर सर्व पाहुण्यांना अल्पोपहार देण्यात येऊन, कार्यक्रम अवघ्या 45 मिनिटांमध्ये आटोपन्यात आला, या लग्न समारंभामध्ये विविध पारंपारिक बाबींना फाटा देण्यात आला, यात मंगल कार्यालय नाही, बँड बाजा नाही, वरात नाही, की घोडागाडी नाही, त्यामुळे ह्या आगळ्यावेगळ्या लग्नाची सर्वत्र चर्चा होत आहे.
नवोदित वधू आणि वरांना भोकर न्यूज लाईव्ह तर्फे नवीन जीवनाच्या खूप खूप शुभेच्छा.
ईतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या Home वर क्लिक करा

0 Comments