भोकर येथील एका इंजिनीयरसह तिघे नांदेड पोलिसांच्या जाळ्यात
नांदेड :(रमेश गंगासागरे )
नांदेड येथील भाग्यनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या एका एटीएमवर तिघांना एलसीबी ने अवैधरित्या रक्कम काढत असताना रंगेहात पकडल्याने त्यांच्यावर विविध कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
घटनेबाबत थोडक्यात माहिती अशी की, भोकर येथील एका उच्चशिक्षित इंजिनियरची या कामी गाडी घेऊन भोकर तालुक्यातील चिदगिरी येथील एक मुकादम एक वाहन चालक आणि बारड येथील एक फोटोग्राफर यांनी तोंडाला दस्ती बांधून विविध बँकेची 35 एटीएम कार्ड घेऊन भाग्यनगर परिसरात असलेल्या एटीएम वरून रक्कम काढत होते, याबाबत पोलिसांना शंका आल्याने त्यांनी तिघांना ताब्यात घेऊन अधिकची विचारणा केली असता त्यांनी हे सर्व कार्ड नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील वनमजुरांची असल्याचे सांगितले त्यांच्याकडे रोख 6 लाख रुपये, 35 विविध बँकेचे एटीएम कार्ड, मजुरांची नावे आणि पासवर्ड असलेली एक डायरी आणि एक कार पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केली आहे.
या घटनेबाबत नांदेड गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी नाईक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भाग्यनगर पोलिस स्थानकात कलम 407, 406, 420 , 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भारती हे अधिक तपास करत आहेत,भोकर येथे दोन दिवसापूर्वी हे अधिकारी येऊन अधिकची चौकशी करून गेल्याने घटनेबाबत भोकर तालुक्यात खळबळ माजली आहे, या तिघांचा मोहरक्या असलेला उच्चशिक्षित इंजिनीयर याससुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले असून या चौघांना नांदेड येथील न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यांना बुधवार दिनांक 27 मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांच्या अधिकच्या चौकशी मधून नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील वनमजुरांची मजुरी हडपणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला असल्याने मजुरांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेले home' दाबा

0 Comments