अर्धापुर :(रमेश गंगासागरे ) राज्यात लॉककडाऊन वरचेवर वाढत गेल्याने या महामारीत अत्यावश्यक सेवा बजावणारे, कामगार, मजूर, विद्यार्थी व वाटसरूंना भोकर येथील विधिसेवा समिती अध्यक्ष व जिल्ह्याचा न्यायालयाचे न्यायधीश मुजीब एस शेख, न्यायाधीश मंदार पांडे, न्यायाधीश बी ए तळेकर यांच्या हस्ते भोकर फाटा येथे गरजू वाटसरु, ट्रक ड्रायव्हर, क्लिनर, यांना फळे, रुमाल, व चप्पलचे वाटप करण्यात आले.
कोरोना या महामारीने संपुर्ण जगाला नेस्तनाबुत करून सोडले असून यात व्यापार,उदयोग,कामे आदी सर्वत्र ठप्प झाल्याने मानवी जनजीवन अगदी विस्कळीत झाले असुन यात गोरगरिब,मजुर,कामगार यांचा मात्र नाहक बळी जातांना दिसत आहे. यांच्या हाताला गेली दोन महिण्यापासून काम नसल्याने व वरचेवर देशासह पहिल्या लॉकडाऊन पासून राज्यातही लॉकडाऊन वाढत गेल्याने यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याने जमेल त्या पद्धतीने आपले घर गाठण्यासाठी जो तो धडपडत आहे त्यातच कोणी पायी तर कोणी आत्यावश्यक सेवेसाठी अहोरात्र रस्त्यावर हॊटेल्स,धाबे बंद असतानाही आपली सेवा देत आहेत त्यांना अशा सैरावैरा झालेल्या अवस्थेत काही देता यावं या उद्देशाने भोकर चे जिल्हा न्यायाधीश मुजीब शेख व वकील मंडळी त्याच बरोबर न्यायालयीन कर्मचारी यांच्या सर्वांच्या सहकार्याने दि. २३ मे रोजी भोकर फाटा येथे परराज्यातील ट्रक ड्रायव्हर,क्लिनर,व रस्त्याने घराकडे जाणाऱ्या मजूर,कामगारांना, वटसरु, गरजूंना फळ वाटप करण्यात आले.कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन च्या काळात भोकर जिल्हा न्यायाधीश रस्त्यावर उतरून कोरोना बाबद यांनी रस्त्यावर उतरून अॅटो द्वारे कोरोना बाबद जनजागृती व समुपदेशन करणे..रहदारी ठिकाणी समुपदेशन करणारे पोस्टर लावणे..भूकेल्यांणा भोजन दानासह व धान्यदान केले आहे तसेच यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर आदी कौतुकास्पद उपक्रम रावले जात असून, आज रोजी फळ दानाचा स्तुत उपक्रम राबविण्याचे कारण आसे की उन्हाळ्याचे दिवस असल्याने अन्न खराब होण्याची शक्यता आसते व रमजानचा महिना आसाल्याने मुस्लीम बांधवाना रोजा आसतो त्यामुळे सर्वांना उपयुक्त ठरावे म्हणुन फळे वाटप करण्यात आली यावेळी न्यायधीश मंदार पांडे, न्यायधीश बी.ए. तळेकर मॅडम, यांचा हस्ते केळी, कलिंगड,बिस्कीट, पाणी बाटली व गरजूंना चप्पल व रुमाल ह्या वस्तूंचे एक किट तयार करून सोशियल डिस्टन्स ठेवून वाटप करण्यात आले असून या वेळी अर्धापुरचे तहसीलदार सुजित नरहारे, अभिवक्ता संघाचे अॅड. एस.एस. कुंटे, अॅड.संदीप कुंभेकर,अॅड. शिवाजी कदम यांच्यासह अर्धपुर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष ओमप्रकाश पत्रे, गोविंद टेकाळे, सखाराम क्षीरसागर, निळकंठ मदने, नागोराव भांगे, प्रकाश वावळे, अरविंद पांचाळ यांची उपस्थिती होती, तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी न्यायालयीन कर्मचारी विठ्ठल कृष्णावाड, अजय नेहुलकर, गोंविद रामकिर्ते, विजय मंडले, विनायक गांजरे, सय्यद इम्रान आदिंनी परिश्रम घेतले तर ,पोउनी के.पी.आगलावे व त्यांचे सहकारी कर्मचारी यांनी महामार्गावरील रहदारी सुरळीत ठेवण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवून सहकार्य केले.
ईतर बातम्या वाचण्यासाठी खालील Home वर टच करा
![]() |
| वाटसरूंना जीवनावश्यक किटचे वाटप करताना न्यायाधीश श्री मुजीब शेख छाया :- संदीप गंगासागरे |
ईतर बातम्या वाचण्यासाठी खालील Home वर टच करा

0 Comments