नांदेड :(रमेश गंगासागरे ) अधिक्षक कार्यालय नांदेड येथे क्रेडिट एँक्सेस ग्रामिन लि.NBFC MFI फायनांन्स कंपनी कडून दि.१६ मे राेजी नांदेड जिल्हा पाेलिस अधिक्षक मा.श्री विजयकूमार मगर व कार्यालयीन कर्मचारी यांना 1000 सँनिटिझर व 1000 मास्कचे वाटप केले आहे.
       काेविड 19 च्या महामारीच्या संकटाने महाराष्ट्रासह देशात काेराेनाच्या आजाराने थैमान घातले आहे. सबंध देशभर काेहराम माजला आहे. त्यामूळे सबंध भारतभर लॉकडाऊन सुरू आहे. पाेलिस प्रशासन या संकटसमई अहाेरात्र परिश्रम घेत आहेत. या कठिन परिस्थीतीत मानवतावादी सेवाभाव या दृष्टिकाेनातून क्रेडिट एँक्सेस लि. NBFC MFI  कंपनी कडून नांदेडचे पाेलिस अधिक्षक 
       मा.श्री मगर यांच्या हस्ते एस.पी. कार्यालयातिल सर्व पाेलिस कर्मचारी यांना क्रेडिट एँक्सेस फायनांन्स कंपनी नांदेडचे झाेनल व्यवस्थापक प्रदिप शेंडगे, मँनेजर द्न्यानेश्वर कदम आणी DM कपिल माळी यांनी 1000 सँनिटिझर व 1000 मास्क वाटप करून नवा आदर्श निर्माण केल्यामुळे त्यांचे सर्वस्थरारून अभिनंदन केले जात आहे.

 ईतर बातम्या वाचण्यासाठी खालील Home वर टच करा