भोकर :(रमेश गंगासागरे ) भोकर शहर व तालुक्यातील आशा वर्कर, आरोग्य अधिकारी तथा खासगी डॉक्टरांच्या वापरासाठी फेस शिल्डचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नुकतेच वाटप करण्यात आले.
कोरोना महामारीच्या वेळी विविध खेडेगावात जाऊन आरोग्य सुविधा पुरविण्याचे महत्वपूर्ण कार्ये हे आशा वर्कर आणि आरोग्य अधिकारी करीत आहेत, हे लोक गावात प्रत्येक्ष फील्डवर काम करताना त्यांचा संपर्क बाधित व्यक्तीबरोबर येत असतो, अश्या वेळी त्यांच्या स्वरक्षणासाठी फेस शिल्ड महत्वापूर्ण भूमिका बजावते हे एका ढाली सारखे त्याच कार्य करत असते, कारण रुगणाच्या तोंडातून जे दवबिंदू बाहेर पडतात ते सरळ त्यापुढील व्यक्तीशी त्यांचा संपर्क होऊ देत नाही, आणि अश्या प्रकारे कॉरोना पासून त्यांचे रक्षण होते,
या कार्यक्रमावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे भोकर विधानसभा संपर्क प्रमुख बाळू देशमुख कामनगावकर, राष्ट्रवादी युवा तालुकाध्यक्ष ऍड. शिवाजी कदम, डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. फेरोज इनामदार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राहुल वाघमारे , ग्रामीण रुग्णालय भोकरचे अधीक्षक डॉ मुंडे, राष्ट्रवादीचे मा. नगरसेवक खाजा तौफिक, मा. नगरसेवक वकील खैराती, मा. पंचायत समिती सदस्य जवाज बरबडेकर यांच्यासह तालुक्यातील CHO डॉक्टर्स , ANM नर्स, आशा वर्कर्स आदी उपस्थित होते.
ईतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या HOME वर क्लिक करा
![]() |
| फेस शील्ड घातलेले कर्मचारी छायाचित्रात दिसत आहेत |

0 Comments