भोकर :(रमेश गंगासागरे ) मागील तीन ते चार वर्षापासून भोकरच्या उड्डान पुलासह भुयारी मार्गाचे काम थांबले असल्याने भोकर वासियांना याचा फार मोठा अडथळा होत होता आता रेल्वेकडून युद्धपातळीवर कामकाज सुरू होत असल्याने भोकर चे नागरिक सुटकेचा श्वास लवकरच घेणार असल्याची चर्चा आहे.
नवीन तयार करण्यात आलेले हेच ते रेल्वे गेट

       रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे गेट च्या बाजूलाच दुसरे रेल्वे गेट तयार करण्यात आले असून येत्या दोन दिवसात भोकर शहरात ये-जा करणारी वाहने बाजूच्या रेल्वे गेटचा वापर करतील असे दिसून येत आहे, कारण याठिकाणी आता युद्धपातळीवर कामकाज हाती घेण्यात आले आहे, त्यानंतर मुख्य रोडवरील भुयारी मार्ग आणि त्या वरून जाणारा उड्डाणपूल ह्या दोन्ही मार्गाचे काम हाती घेण्यात येत असल्याचे येथील कामकाजावरून दिसून येत आहे, त्यामुळे चार वर्षानंतर भोकर वासियांना रेल्वे गेटचा होणारा अडथळा आता कायमचा दूर होणार असल्याची चर्चा भोकर शहरात होत आहे, बाजूच्या नवीन रेल्वे गेट वरून जड वाहनांना प्रवेश नाकारण्यात आला असल्याने सदरील वाहने बायपासचा वापर करतील असे येथील कामकाजा वरून दिसून येत आहे.

ईतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या home' वर क्लिक करा