भोकर :- (रमेश गंगासागरे ) अवैध रेतीची वाहतूक करणारा ट्रक आज भोकरच्या तहसीलदारानी पकडून त्यावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी तहसील कार्यालय भोकर येथे आणून जप्त केला आहे.
जप्त करण्यात आलेल्या वाहनासह तहसीलदार भरत सूर्यवंशी दिसत आहेत

       मागील दोन महिन्यापासून भोकर तालुक्यात वाळूमाफियांनी अक्षरशः थैमान माजवले होते, प्रशासनाला व पोलिसांना न जुमानता हे वाळू माफिया बिनधास्तपणे दिवसा व रात्री चोरट्या मार्गाने वाळू विक्री करत होते, या बाबद अनेक वर्तमानपत्रात बातम्या छापून येताच खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने आज भोकर ते मुदखेड रोडवर रिठा शिवारात डोरली याठिकाणी अवैद्य रेतीचा ट्रक जप्त केला, त्यामुळे वाळूमाफिया मध्ये मोठी खळबळ माजली आहे, आज तहसीलदार भरत सूर्यवंशी यांनी केलेल्या कारवाईत ट्रक क्रमांक एम. एच. 22, F599
वाहन चालक ,माधव बालाजी उमाटे, रा. वासरी, ता. मुदखेड यास ताब्यात घेण्यात आले असून, वाहणाचा मालक सुरेश गोविंदराव खानसोळे, रा. वासरी, ता. मुदखेड यांना प्रशासकीय पातळीवरून ट्रक जप्ती बाबद कळविण्यात आले आहे.
       वाळू माफिया विरोधात स्वतः तहसीलदार रस्त्यावर उतरल्याचे पाहून वाळू माफियांच्या उरात धडकी भरली असल्याची चर्चा भोकर तालुक्यात होत आहे.

ईतर बातम्या वाचण्यासाठी खाली HOME दाबा