नांदेड :(रमेश गंगासागरे ) 
साठ दिवसांच्या विश्रांतीनंतर नांदेड जिल्ह्यातील बहुतांश दुकानदारांना जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी दिलासा दिला असून उद्या सोमवारपासून बहुतांश दुकाने सकाळी 6 ते दुपारी 2 वाजेपर्यंत उघडतील असे आदेश जारी करण्यात आले आहेत. लॉक डाऊन 31 मे पर्यंत कायम राहील.
       पाच दिवसांचा आठवडा राहील. (सोम ते शुक्र)
हे चालू राहतील:-

 अॅटोमोबाईल्स कॉम्पुटर /इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रीकल्स टायर्स, बॅटरी, मोबाइल शॉप, रस्सी, वॉच स्टोअर्स, स्टेशनरी / बुक स्टोअर्स (पुस्तकालय), सायकल स्टोअर्स, स्टील ट्रेडर्स, बिल्डींग मटेरीयल याच दुकानांना परवानगी
- किराणा दुकान रविवार वगळता अन्य दिवशी सकाळी ७ ते दुपारी २
- मेडिकल, हॉस्पिटल २४x७
अटी व शर्ती :- 
   - प्रत्येक दुकानदाराने आपल्या ग्राहकासाठी सोशल डिस्टन्स सिंग आणि हँडवॉश ची सुविधा करावी . 
- तोंडावर मास्क बांधणे बंधनकारक.   
- एका वेळी पाच पेक्षा अधिक ग्राहक नको.
- उल्लंघन केल्यास पाच हजाराचा दंड.
हे बंद राहणार:-      कापड, रेडिमेड, चप्पल, बूट, मिठाई दुकाने, फर्निचर दुकाने बंदच राहणार.

     ईतर बातम्या वाचण्यासाठी खाली लाल रंगात असलेल्या HOME वर क्लिक करा