भोकर : (रमेश गंगासागरे ) येथील दिगंबरराव बिंदू कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व कला महाविद्यालय, भिगवन, ता. इंदापूर जि. पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 'ओळख मूर्तीशास्त्राची' हे ऑनलाइन पद्धतीने दोन आठवडीय निशुल्क राज्यस्तरीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.
करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला असल्यामुळे युजीसीच्या मार्गदर्शक तत्वानुसार महाविद्यालयीन शिक्षकांना 'वर्क फॉर्म होम' या अंतर्गत विविध कार्यक्रम देण्यात आलेले आहेत. त्यानुसार या दोन महाविद्यालयांच्या समन्वय कराराच्या माध्यमातून या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. सदरील प्रशिक्षण कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध भागातून ११७ प्रशिक्षणार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. या प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत दररोज अभ्यास देणे, स्वाध्याय करून घेणे आणि चर्चासत्र आयोजित करणे असा होता. हे सारे ऑनलाईन प्रशिक्षण सोशल मिडीयाच्या माध्यमातून दि. २५ एप्रिल ते १० मे २०२० या काळात यशस्वीरित्या पार पडले.
कलेची उत्पत्ती, कलेचे प्रयोजन, मूर्तिकलेचा उद्गम आणि विकास, वेगवेगळ्या कालखंडात निर्माण झालेल्या मूर्ती, शिव, विष्णू, ब्रह्म आणि त्यांच्या परिवार देवता, सूर्य, कुबेर, अष्टदिक्पाल, नवग्रह, बौद्ध प्रतिमा लक्षण, जैन प्रतीमा लक्षण, सुरसुंदरी, यक्ष, गंधर्व, विद्याधर आणि किन्नर, मूर्तीकलेतील विविध प्राणी, मूर्ती कलेतील आसन, विविध हस्त मुद्रा आणि कामशिल्पे यांचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासामुळे मूर्तीकले बाबतीत जाणीव जागृती निर्माण करण्या संदर्भाने फार मोठे यश प्राप्त झाले. या दोन आठवडे प्रशिक्षण कार्यक्रमात साधन व्यक्ती म्हणून मूर्तीशास्त्राचे अभ्यासक लक्ष्मीकांत सोनवटकर, रा. चारठाणा, परभणी, आदित्य फडके रा. सातारा आणि प्रा. डॉ. शांता जाधवर, रा. बीड यांनीही विविध विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आयोजक, मार्गदर्शक आणि साधनव्यक्ती म्हणून प्रा. डॉ. अरविंद सोनटक्के यांनी काम पाहिले असून प्रा. सुरेंद्र शिरसट यांनी समन्वयक म्हणून भूमिका पार पाडली. सदरील कार्यक्रमाच्या आयोजन व यशस्वितेबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. माधवराव पाटील किन्हाळकर व सचिव श्री मुराद मांजरमकर तसेच दोन्ही महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंजाब चव्हाण आणि डॉ. महादेव वाळुंज यांनी त्यांचे कौतुक केले आहे.
ईतर बातम्या वाचा, खालील लाल रंगाच्या HOME वर क्लिक करा

0 Comments