दिल्ली (वृत्तसंस्था ) लॉक डाऊन मध्ये अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना आपल्या मूळ गावी परतण्याचा खर्च काँग्रेस उचलणार असल्याची माहिती सोनिया गांधी यांनी आज दिली आहे.

       मजुरी करून पोट भरण्यासाठी परप्रांतीय नागरिक इतर राज्यात, मजुरी करण्यासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने येत असतात, यावर्षी 22 मार्च पासून जनता कर्फ्यू त्यानंतर लॉक डाऊन झाल्यामुळे अशा मोलमजुरी करणाऱ्या परप्रांतीय मजुरांचा रोजगार तर बुडालेला आहे पण, त्यांच्या खाण्या आणि पिण्याची व्यवस्थाही पुरेपूर होत नसल्याने त्यांना आता आपल्या मूळ गावी जावे वाटत आहे, या मजुरांना आपल्या मूळ गावी जायचे आहे, अशा मजुरांचा खर्च आता काँग्रेस पार्टी उचलणार असल्याची माहिती काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांनी दिली आहे.
       त्यांनी प्रत्येक राज्यात असलेल्या आपल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सूचना दिलेल्या आहेत की, जर कोणी परप्रांतीय मजूर आपल्या मूळ गावी जाण्यासाठी इच्छुक असेल तर अशा मजुरांची यादी बनवून त्यांना मूळ गावी जाण्यासाठी मदत करावी. अशा प्रकारच्या सूचना सोनिया गांधी यांनी दिलेल्या असल्यामुळे परप्रांतीय मजुरांना मोठा दिलासा मिळाला आहे.